Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रअश्विनी भिडेंना आदित्य ठाकरेंशी पंगा भोवला

अश्विनी भिडेंना आदित्य ठाकरेंशी पंगा भोवला

Aaditya Thackeray Ashwini Bhide,Aaditya Thackeray, Ashwini Bhide,Aaditya, Thackeray, Ashwini, Bhide

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी युती सरकारच्या काळात युवा  सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याशी आरे कारशेड प्रकरणात झाडांच्या कत्तल प्रकरणी वाद घातला होता. या दोघांमध्ये ट्विटर युध्द रंगले होते. अखेर सत्ताबदल झाल्यानंतर आदित्य ठाकरे मंत्री झाले आणि अश्विनी भिडेंना व्यवस्थापकीय संचालक पदावरून बाजूला करण्यात आले.

अश्विनी भिडे ह्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. सत्ता परिवर्तन झाल्यानंतर त्यांच्या जागी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदी रंजीतसिंह देओल यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं २० आयएएस अधिका-यांच्या बदल्या केल्या. पंरतु या बदल्यांमध्ये अश्विनी भिडे यांना पदावरून हटवल्याचीच चर्चा जोरात सुरु आहे.

काय होता वाद…

आरे कारशेडमध्ये झाडांच्या कत्तलीला आदित्य ठाकरेंनी विरोध केला होता. परंतु त्यांच्या या विरोधाला न जुमानता अश्विनी भिडेंनी कार्य सुरुच ठेवलं होतं. आरेमधील नागरिकांनीही वृक्षतोडीला विरोध केला होता. आंदोलन करणा-या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments