Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबई २६/११ हल्ल्यातील कमांडो राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढणार

मुंबई २६/११ हल्ल्यातील कमांडो राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढणार

Surender Singh,NSG Commando,Surender,Singh,NSG,Commando,Delhi Assembly Election,Delhi Election
Image: ANI

मुंबई : दिल्लीत विधानसभेत वातावरण चांगलेच तापले आहेत. मुंबई (२६/११) हल्ला प्रकरणात अतिरेक्यांशी मुकाबला करणारे एनएसजी कमांडो आणि आपचे आमदार सुरेंदर सिंह दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. परंतु ते आम आदमी पार्टीकडून नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून ही निवडणूक लढवणार आहेत.

आज मी खूपच दुःखी

आप चे आमदार सुरेंदर सिंह यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत असल्याचे मंगळवारी जाहीर केले. आपल्याला अनेक पक्षांकडून यासाठी ऑफर होती मात्र मी राष्ट्रवादी काँग्रेसची निवड केली असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, उद्या (बुधवारी २२ जानेवारी ) याबाबत माहिती देऊ. असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सुरेंदर सिंह यांना आपने पुन्हा तिकीट न दिल्याने नाराज झालेल्या सुरेंदर सिंह यांनी मंगळवारी ट्विटद्वारे आपण आपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले. आज मी खूपच दुःखी आहे. त्यामुळे पक्षाचा राजीनामा देत आहे असं सांगितलं.

कोण आहेत सुरेंदर सिंह…

मुंबई हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी दोन हात करणारे एनएसजी कमांडो सुरेंदर सिंह यांनी सन २०१३ मध्ये आपच्या तिकीटावर दिल्लीची विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंगातून भाजपाच्या तीन वेळा आमदार राहिलेल्या करन सिंह तन्वर यांचा पराभव केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments