Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रहिंगणघाट : ‘त्या’ पीडितेची बाजू उज्ज्वल निकम मांडणार!

हिंगणघाट : ‘त्या’ पीडितेची बाजू उज्ज्वल निकम मांडणार!

Wardha Teacher,Wardha, Teacher,Vicky Nagarale

मुंबई : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम सरकारच्या वतीने पीडितेची बाजू मांडणार आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.

एकतर्फी प्रेमातून विक्की नगराळे या माथेफिरूनं ३ फेब्रुवारी रोजी हिंगणघाट येथील शिक्षण तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं होतं. पीडित तरुणी कॉलेजच्या दिशेनं जात असताना नगराळे यानं हा हल्ला केला होता. त्यात ही तरुणी बरीच भाजली आहे. तिच्यावर सध्या नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तिच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून शर्थीचे प्रयत्न करत आहे. या घटनेमुळं राज्यभरात संताप आहे. पीडित तरुणीच्या प्रकृतीसाठी ठिकठिकाणी प्रार्थना होत असून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्यासाठी मोर्चे, निदर्शनं सुरू आहेत. राज्य सरकारने मुख्यमंत्री सहायता निधीमधून तरुणीच्या उपचाराचा खर्च उचलला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments