Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या'महाविकासआघाडी' शुक्रवारी सत्तास्थापनेचा दावा दाखल करणार

‘महाविकासआघाडी’ शुक्रवारी सत्तास्थापनेचा दावा दाखल करणार

'Mahavikasaghadi' will file a claim for power on Friday
नवी दिल्ली : काँग्रेस-राष्ट्रवादीची आजची बैठक संपली असून सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. उद्या आम्ही आमच्या निवडणुकीतील मित्रपक्षांशी चर्चा करू. त्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करूनच ‘महाविकासआघाडीची’ अंतिम घोषणा करू आणि त्यानंतरच राज्यपालांना भेटू, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात राज्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीचं नवं सरकार स्थापन होण्याची चिन्हे दिसत आहे. राज्याला महाविकास आघाडीच्या रुपाने नवं सरकार मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जनतेलाही सरकार कधी स्थापन होणार याची उत्सुकता होती.

शिवसेना आमदारांची शुक्रवारी मातोश्रीवर बैठक होणार आहे. दिल्लीतल्या बैठकांचा सिलसिला आज संपला असून मुंबईमध्ये शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चर्चा करुन सत्तास्थापन करणार आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेची प्रतिक्षा संपणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments