Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमनसेच्या पोस्टरमध्ये भगव्या रंगाचा महाराष्ट्र!

मनसेच्या पोस्टरमध्ये भगव्या रंगाचा महाराष्ट्र!

Raj Thackeray MNS,Raj, Thackeray, MNS,Raj Thackeray,Sena,Maharashtra Navnirman Senaमुंबई : मनसेचं बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनानिमित्त (२३ जानेवारी) ला राज्यस्तरीय महाअधिवेशन मुंबईत होत आहे. त्यासाठी मनसेचं नवं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. त्यामध्ये “विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा’’ असं नमूद करण्यात आलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे २३ जानेवारीला कोणती भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे मनसे आणि भाजप युती होणार अशी चर्चा सुरु असताना मनसेच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे. मनसे झेंड्याच्या रंगामध्ये बदल करणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे मनसेचा झेंडा भगवा होणार का? याचीही उत्सुकता सर्वांना लागलेली आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजपचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये गुप्त बैठक झाली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये युती होणार अशी चर्चा सुरु होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मनसेने भूमिका बदलली तरचं युती बाबत विचार करु असं सांगितलं होतं. तर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राजकारणात कुणीही कुणाचा कायम शत्रू नसतो असं सांगितलं होतं. त्यामुळे भाजप आणि मनसेच्या युती बाबत सर्वांना उत्सुकता लागलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments