Placeholder canvas
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई...तर जस्टिस लोया प्रकरणाची चौकशी करु; गृहमंत्री अनिल देशमुखांचे संकेत

…तर जस्टिस लोया प्रकरणाची चौकशी करु; गृहमंत्री अनिल देशमुखांचे संकेत

Justice loya Amit Shah Anil Deshmukh,Justice, loya, Amit, Shah, Anil, Deshmukh,Justice loya, Amit Shah, Anil Deshmukh,Justice BH loya मुंबई : काही जणांनी मला जस्टीस लोया प्रकरणात भेटण्याची विनंती केली होती. त्यावर मी त्यांना येऊन भेटा, त्यानंतर मी चौकशी करतो असं त्यांना म्हटलं आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज गुरुवार (९ जानेवारी) रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. गँगस्टर एजाज लकडावालाला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्याने, या कारवाईची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्याचवेळी त्यांना न्यायमूर्ती लोया प्रकरणाबाबतही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांनी जस्टीस लोया प्रकरणाबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे जस्टीस लोया प्रकरणातील संबंधित लोक आजच मला भेटणार आहेत, असंही गृहमंत्री देशमुख यावेळी म्हणाले.

राज्याचे नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायमूर्ती लोया प्रकरणात हात घालत, थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना टार्गेट करण्याचे संकेत दिले आहेत. न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणात अमित शाहांवर आरोप आहेत. त्यामुळे याप्रकरणात हात घालून, राष्ट्रवादीचे नेते असलेले अनिल देशमुख थेट अमित शाहांना आव्हान देत आहेत का असा प्रश्न आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांचं हे विधान म्हणजे न्यायमूर्ती लोया प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्याचे संकेत आहेत. जर ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला तर गृहमंत्री अमित शाह यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

काय आहे न्यायामूर्ती लोया मृत्यू प्रकरण…

जस्टिस ब्रिजगोपाल लोया हे गुजरातमधल्या सोहराबुद्दीन बनावट एन्काऊन्टर प्रकरणात CBI कोर्टाचे न्यायाधीश होते. याच खटल्यात भाजप अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही आरोप असल्याने हा खटला राजकीयदृष्ट्याही संवेदनशील झाला होता. नागपूरमध्ये एका लग्नसोहळ्याला गेलेले असताना लोया यांचा १ डिसेंबर २०१४ रोजी संशयास्पद मृत्यू झाला. जस्टिस लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असे सांगण्यात येत आहे. मात्र लोया यांच्या मृत्यूनंतर सोहराबुद्दीन एन्काऊन्टर खटल्यातून अमित शाह यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments