Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeकोंकणठाणेआमचा जन्मच मांसाहार खाण्यासाठी झाला, आव्हाडांचा सोमय्यांना टोला

आमचा जन्मच मांसाहार खाण्यासाठी झाला, आव्हाडांचा सोमय्यांना टोला

Jitendra Awhad Kirit Somaiya,Jitendra, Awhad, Kirit, Somaiya

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी शहापूर येथील एका आदिवासी कुटुंबासोबत भोजन केलं होतं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर टीका केली होती. “आमचा जन्मच मांसाहार खाण्यासाठी झाला आहे. देशातील ९० टक्के लोक मांसाहार खाल्ल्याशिवाय जिवंत राहू शकत नाहीत. तरीही गोहत्याबंदीच्या नावाखाली हे सरकार आमच्या खाण्याच्या अधिकारावर गदा आणत आहे”, अशी टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना टोला लगावला.

ठाण्यात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याविरोधात मूकमोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आंदोलकांना संबोधित करत असताना जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर सडकून टीका केली. “किरीट सोमय्या यांनी लिहून पाठवलं आहे की, गरीब आदिवासीच्या घरी गेला आणि चिकन खाऊन आला. गरीब आदिवासीदेखील चिकनच खातो कारण तेच आमचं खाद्य आहे. या देशातील ९० टक्के नागरिक मांसाहारशिवाय जिवंत राहू शकत नाहीत. उद्या हे मोदी-शाह फापडा, जिलेबी आणि ढोकळा देशाचे राष्ट्रीय अन्न म्हणून जाहीर करायला मागे पुढे पाहणार नाहीत”, असा टोला आव्हाड यांनी भाजप नेत्यांना लगावला. “याशिवाय कोणताही मुस्लीम बांधव गायीचं मांस खात नाही”, असा दावा आव्हाड यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments