Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशदिल्ली हिंसाचार पूर्वनियोजीत कट, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : सोनिया गांधी

दिल्ली हिंसाचार पूर्वनियोजीत कट, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : सोनिया गांधी

Sonia Gandhi Meeting,Sonia Gandhi, Meetingनवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील तीन दिवस झालेल्या हिंसाचारानंतर आज चौथ्या दिवशी तणावपू्र्ण शांतता आहे. हा हिंसाचार पूर्वनियोजीत कट होता. भाजपच्या नेत्यांनी दंगल घडवली. या हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार असून, गृहमंत्री अमित शाहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीनी पत्रकार परिषदेत केली आहे.

दिल्लीतल्या जनतेनं शांतता राखावी असं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं आहे. गेल्या तीन दिसांपासून हिंसाचार सुरु असताना गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काय करत होते. विरोधकांशी सत्ताधा-यांनी कोणतीही चर्चा केली नाही. पोलिस बंदोबस्त का वाढवला नाही. दंगल शांत करण्याचा कोणताही प्रयत्न का झाला नाही असे अनेक प्रश्न सोनिया गांधींनी उपस्थित केले.

दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत २० लोकांचा बळी गेला आहे. तर, २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.  दुकानांची,वाहनांची तोडफोड, जाळपोळ सुरुच आहे. दिल्लीतील हिंसाचार रोखण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. कायदा सुव्यस्था नियंत्रणात आणण्यासाठी हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपती भवनावर मार्च काढण्यात येणार आहे. राष्ट्रपतींना निवेदन सादर करणार आहे. पत्रकार परिषदेत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद, रणदिप सुरजेवाला यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. दिल्लीत चार दिवसांपासून हिंसाचार उफाळला आहे. केंद्र सरकार, गृह खात्याला हा हिंसाचार रोखण्यात अपयश आले आहे. शाळांना सुटी देण्यात आली. परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जाफराबाद, मौजपूर, चांद बाग, कारावाल नगर येथे संचारबंदली लागू करण्यात आली असून दंगेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत.

सोनिया गांधींच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे…

दिल्लीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट, भाजप नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे दिल्लीत हिंसा : सोनिया गांधी

भाजप नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे दिल्लीत हिंसा : सोनिया गांधी

केंद्र सरकारच्या जाणीवपूर्वक ७२ तासात कारवाई केली नाही, सरकारच्या दुर्लक्षामुळे दिल्लीत २० जणांचा बळी : सोनिया गांधी

दिल्लीतल्या स्थितीला केंद्र सरकार जबाबदार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची पत्रकार परिषदेत मागणी

हिंसाचार पाहता तात्काळ कारवाईची गरज होती : सोनिया गांधी

गेल्या रविवारपासून गृहमंत्री अमित शाह कुठे होते?: सोनिया गांधी

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी अशा स्थितीत जमिनीवर काम करणं अपेक्षित होतं, जनतेला विश्वास द्यायला हवा होता : सोनिया गांधी

दिल्लीतील जनतेनं शांतता राखावी : सोनिया गांधी

राष्ट्रपती उपलब्ध नसल्यामुळे मार्च गुरुवारी निघणार…

दिल्लीतल्या स्थितीवर दुपारी काँग्रेस मुख्यालय ते राष्ट्रपती भवन असा जो मोर्चा निघणार होता तो आता उद्या होणार आहे. राष्ट्रपती कार्यालयानं आज आपण उपलब्ध नसल्याचं कळवलं, त्यामुळे हा मोर्चा पुढे ढकलल्याचं काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलंय

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments