Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईराज्यपाल के.सी.पाडवी यांच्यावर भडकले; पुन्हा वाचली शपथ

राज्यपाल के.सी.पाडवी यांच्यावर भडकले; पुन्हा वाचली शपथ

Bhagat Singh Koshyari KC Padvi,Bhagat, Singh, Koshyari, KC, Padvi,Maharashtra Cabinet Expansion,Maharashtra, Cabinet, Expansionमुंबई : महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीच्या सरकारचा आज, सोमवारी दुपारी १ वाजता मंत्रिमंडळ विस्तार झाला. तिन्ही पक्षांचे एकूण ३६ मंत्र्यांची शपथविधी सोहळा सुरु आहे. यामध्ये २५ कॅबिनेट तर १० राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मात्र, यावेळी काँग्रेसचे अक्कलकुवाचे आमदार मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भडकले. पुन्हा शपथ वाचा. मनोगत व्यक्त करु नका असे सुनावले. त्यानंतर पुन्हा के.सी.पाडवी यांनी शपथ घेतली.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराचा सोहळा विधानभवनाच्या प्रांगणात संपन्न होत आहे. ३६ मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये शिवसेनेचे १३ राष्ट्रवादीचे १३ तर काँग्रेसचे १० नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये शिवसेनेचे १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री, राष्ट्रवादीचे १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री तर काँग्रेसचे ८ कॅबिनेट तर २ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

उपमुख्यमंत्री – अजित पवार

कॅबिनेट मंत्री…

अशोक चव्हाण, के सी पडवी, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सुनिल केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अस्लम शेख,

राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबिनट मंत्री…

अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, धनंजय मुंडे, राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे

शिवसेना कॅबिनेट मंत्री…

अनिल परब, आदित्य ठाकरे, उदय सामंत, संदिपान भुमरे, आशिष जैसवाल, संजय राठोड, गुलाबराव पाटील, दादा भुसे यांचा समावेश आहे.

राज्यमंत्रीपद…

अब्दुल सत्तार
सतेज (बंटी) पाटील,
विश्वजीत कदम
शंभुराजे देसाई
बच्चू कडू
दत्तात्रय भरणे
आदिती ठाकरे
संजय बनसोडे
भानुदास तनपुरे
राजेंद्र पाटील

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments