Placeholder canvas
Tuesday, April 30, 2024
Homeदेशकोरोनाचा देशातील चौथा बळी, पंजाबमध्ये

कोरोनाचा देशातील चौथा बळी, पंजाबमध्ये

India's first coronavirus death confirmed in Karnataka

नवी दिल्ली : देशातील कोरोना बाधितांची संख्या ४ वर पोहोचली आहे. गुरुवारी पंजाबमध्ये एकाचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक कोरोनाचा बळी गेलाय.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती जाहीर करण्यात आलीय. पंजाबच्या नवाशहर जिल्ह्यातील एका रुग्णालयात ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू करोना संक्रमणामुळे झाल्याचं उघड झालंय. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा व्यक्ती दोन आठवड्यांपूर्वी जर्मनीहून – इटली – भारत असा प्रवास करत मायदेशात दाखल झाला होता. छातीत दुखत असल्याची तक्रार घेऊन तो रुग्णालयात दाखल झाला होता.

मृत व्यक्तीला मधुमेह तसंच उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. या व्यक्तीचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते वैद्यकीय अहवालानुसार, हा व्यक्ती करोना संक्रमित असल्याचं आढळलंय. बुधवारी बांगा सामुद्यिक आरोग्य केंद्रात त्याचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments