Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई‘या’ कारणामुळे संजय राऊतांना ताब्यात घ्या; कदमांची पोलिसांकडे धाव

‘या’ कारणामुळे संजय राऊतांना ताब्यात घ्या; कदमांची पोलिसांकडे धाव

Ram Kadam Sanjay Raut,Ram Kadam, Sanjay Raut,Ram, Kadam ,Sanjay, Raut

मुंबई : मी क्राईम रिपोर्टींग करताना दाऊद इब्राहीमला भेटलो. दम दिला असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत बुधवारी (१५ जानेवारी) ला केलं होतं. तसेच उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत का? याचा पुरावा द्यावा. असंही विधान केलं होतं. त्यामुळे भाजप आमदार राम कदम यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेतली. खासदार संजय राऊत यांना ताब्यात घ्या. त्यांची चौकशी करा अशी मागणी केली आहे.

संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांबाबत वादग्रस्त विधान केलं. शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. दाऊद इब्राहिम सोबत संबंध होते. त्यामुळे त्यांच्यावर या दोन्ही प्रकरणात कारवाई करावी, गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी आज गुरुवार (१६ जानेवारी) घाटकोपर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.

दाऊद हा गल्लीबोळातील गुंड नाही, तो आंतरराष्ट्रीय गँगस्टर आहे आणि शिवसेनेचा एक माणूस थेट म्हणतो की त्याचे दाऊदशी संबंध आहेत, मग तुम्ही काहीही कारवाई करणार नाही. पोलीस खातं काय करत आहे”, असा सवालही यावेळी राम कदमांनी उपस्थित केला. “हे पोलीस खातं सरकारच्या दबावाखाली काम करत आहे, त्यांनी निरपेक्षपणे काम करावं”, अशी मागणी राम कदम यांनी यावेळी केली. जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर आम्ही आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन करु, त्यांनीही ऐकलं नाही तर मुख्यमंत्र्यांकडे जाऊ, पण हे प्रकरणं तडीस नेऊ, असंही राम कदम म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments