Placeholder canvas
Tuesday, April 30, 2024
Homeदेशअनुराग ठाकूरसह कपिल मिश्रा, परवेश वर्माविरुध्द गुन्हा दाखल करा : काँग्रेस

अनुराग ठाकूरसह कपिल मिश्रा, परवेश वर्माविरुध्द गुन्हा दाखल करा : काँग्रेस

नवी दिल्ली : चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, खासदार परवेश वर्मा, कपिल मिश्रा या तिन्ही नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करुन सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांनी केली आहे.

भाजपच्या नेत्यांच्या चिथावणीखोर नेत्यांच्या वक्तव्यामुळे दिल्लीत दंगल उसळली असा आरोप विरोधकांनी केला आहे. विशेष म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर आणि खासदार परवेश वर्मा यांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. त्यांना उत्तर देण्यात मुदत देण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानं त्यांच्यावर कारवाई केली आहे. भाजपनं स्टार प्रचारकांच्या यादीतून या दोघांची नावं हटवावीत, असे आदेश आयोगानं दिले होते.

ठाकूर आणि प्रवेश वर्मा काय म्हणाले?

काश्मीरमध्ये जे काश्मिरी पंडितांसोबत झाले होते. तेच दिल्लीमध्ये देखील होऊ शकते. शाहीन बागेतील आंदोलक घरात घुसून महिलांवर बलात्कार करू शकतात, असं विधान भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी केलं होतं. तर, केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रचार सभेत ‘गद्दारांना गोळ्या झाडा’ असं म्हटलं होतं.

‘अरविंद केजरीवाल हे दहशतवादी’

शाहीन बागची तुलना पाकिस्तानशी केल्यानंतर, भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांची तुलना दहशतवादी आणि नक्षलवाद्यांशी केली होती. नक्षलवादी आणि दहशतवादी ज्या प्रमाणं सरकारी मालमत्तेचं नुकसान करतात, ते काम दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सुद्धा करत आहेत, असं विधान वर्मा यांनी केलं आहे.

अन्यथा आम्ही कुणाचेही ऐकणार नाही

सीएए विरोधात आंदोलन करणा-या महिलांना कपिल मिश्रांनी धमकी दिली होती. आम्ही ट्रम्प यांच्या दौरापर्यंत शांत बसू. त्यानंतर आम्ही पोलिसांचेही ऐकणार नाही. जाफराबाद येथील जागा रिकाम्या करी अशी धमकी दिली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments