Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeदेशमहिलांनाही लष्करात समान संधी; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले

महिलांनाही लष्करात समान संधी; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले

Woman India Army Officers,Woman, India Army Officers,Woman India, Army Officers
Representational Image

नवी दिल्ली : लष्करातील तुकडीचं नेतृत्व महिलांकडे देण्यासंदर्भात केंद्र सरकारचा नकार होता. या भूमिकेवरून सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारत दिल्ली उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं पालन करत महिलांनाही लष्करात समान संधी द्या, असे आदेश दिले आहेत.

दिल्ली उच्च न्यायालयानं सैन्यातील तुकडीचं नेतृत्व महिलांकडे (कमांड पोस्ट) देण्यासंदर्भात महत्त्वाचा निकाल दिला होता. लष्करातही महिलांना तुकडीचं नेतृत्व दिलं जावं, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशाला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. या आव्हान याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारचे कान उपटत दिल्ली उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाची अमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठानं महिलांविषयी घेतलेल्या भूमिकेवरून केंद्र सरकारची कानउघडणी केली. लष्करातही समानता आणावी लागेल. केवळ शारीरिक मर्यादा आणि सामाजिक नियमांमुळे महिलांना समान संधी नाकारता येणार नाही. हे कधीही स्वीकारलं जाणार नाही. केंद्र सरकारने महिलांविषयीचा आपली मानसिकता बदलावी आणि दिल्ली उच्च न्यायालयानं महिलांना कमांड पोस्ट देण्यासंदर्भात कायमस्वरूपी कमिशन स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच पालन केंद्र सरकारनं करावं. तीन महिन्यात केंद्र सरकारने कमिशन स्थापन करावा,” अशा शब्दात न्यायालयाने केंद्र सरकारची कानउघडणी केली.

लष्करी सेवेत कार्यरत असलेल्या लेफ्टनंट कर्नल सीमा सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. “सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय ऐतिहासिक आणि सुधारणावादी आहे. महिलाना समान संधी मिळायला हव्या,” असं सीमा सिंह म्हणाल्या.

सैन्यातील जवानांच्या तुकडीचं नेतृत्व महिलेकडे देण्यासंदर्भात केंद्र सरकारनं विरोधी भूमिका घेतली होती. शारीरिक क्षमता आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे महिला सैन्यातील संकटं आणि आव्हानांचा सामना करू शकणार नाही, असं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयसमोर झालेल्या सुनावणीत म्हटलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments