Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याएन्काउंटर : पोलीस कायदा हातात घेण्याची भीती - उज्जवल निकम

एन्काउंटर : पोलीस कायदा हातात घेण्याची भीती – उज्जवल निकम

Lawyer Ujjwal Nikam,Ujjwal Nikam,Ujjwal,Nikamमुंबई: हैदराबाद बलात्कार प्रकरणातील एन्काउंटर प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. पीडितेला न्याय देण्यासाठी वापरलेली पद्धत अयोग्य असल्याची खंत निकम यांनी व्यक्त केली. पोलिसांच्या कृत्याला जाहीर समर्थन दिल्याने ते कायदा हातात घेण्याची भीती निकम यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना व्यक्त केली.

निकम यांनी या एन्काउंटर प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. पोलीस बेसावध आणि निष्काळजी होते का? बलात्काराचे आरोपी ठार झाल्याचा आनंद असला, तरी पोलिसांच्या कृत्याला जाहीर समर्थन दिल्याने ते कायदा हातात घेण्याची भीती आहे, असं मत निकम यांनी व्यक्त केले.

पीडितेला न्याय देण्यासाठी वापरलेली पद्धत अयोग्य असल्याची खंत निकम यांनी बोलून दाखवली. झटपट न्याय देण्याच्या प्रकारामुळे कायद्याचं राज्य धोक्यात येईल अशीही भीती त्यांनी व्यक्त केली. शुक्रवारी हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तपासासाठी घटनास्थळी नेलं. त्यावेळी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments