Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईचंदा कोचर यांची ७८ कोटींची मालमता जप्त; ईडीची कारवाई

चंदा कोचर यांची ७८ कोटींची मालमता जप्त; ईडीची कारवाई

Chanda Kochhar,ICICI,Chanda, Kochhar,EDमुंबई : आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या माजी अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबावर ईडीने कारवाई केली आहे. ईडीने चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबाची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये त्यांचे मुंबईतील फ्लॅट्स आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपन्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत ७८ कोटी असल्याची माहिती आहे.

चंदा कोचर यांच्याविरोधात २०१२ मध्ये आयसीआयसीआय बँकेकडून मिळालेल्या  ३,२५० कोटींच्या कर्जाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आयसीआयसीआय (ICICI) बँकेची कर्जदार कंपनी व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजद्वारे कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूकिबाबत घोटळ्याच्या आरोपांनंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये चंदा कोचर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बँकेकडून चंदा कोचर यांची त्यांच्या पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. याबाबत चंदा कोचर यांनी काही दिवसांपूर्वी बँकेच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं.२०१८ मध्ये जेव्हा चंदा कोचरने राजीनामा दिला होता, तेव्हा बँकेने तो स्वीकार केला होता. त्या राजीनाम्याला वैध मानले जावे, अशी मागणी चंदा कोचर यांनी न्यायालयाकडे केली आहे.

यापूर्वी ४ ऑक्टोबर २०१९ ला चंदा कोचर यांनी पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर बँकेने निश्चित कालावधीपूर्वीच पद सोडण्याची मागणी मान्य करत संदीप बक्षी यांची एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली होती.

हे आहे प्रकरण…

व्हिडीओकॉन ग्रुपला २०१२ मध्ये आयसीआयसीआय बँकेने ३,२५० कोटींचं कर्ज दिल्याचं हे प्रकरण आहे. एकूण ४० हजार कोटींच्या कर्जाचा हा एक भाग होता, जे व्हिडीओकॉनने एसबीआयच्या नेतृत्त्वात २० बँकांकडून घेतलं होतं. २०१० मध्ये ६४ कोटी रुपये न्यूपॉवर रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेड (NRPL) ला दिले. ही कंपनी धूत यांनी दीपक कोचर आणि इतर दोन नातेवाईकांसह मिळून उभी केली, असा आरोप आहे.

चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कर्जदाराकडून आर्थिक लाभ दिले गेले, असाही आरोप करण्यात आलाय. आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर सहा महिन्यातच धूत यांनी कंपनीची मालकी दीपक कोचर यांच्या ट्रस्टला केवळ नऊ लाख रुपयांमध्ये विकल्याचाही आरोप आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments