Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा; राज ठाकरेंचा इशारा

ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा; राज ठाकरेंचा इशारा

राज ठाकरेंच्या मनसेचा शॅडो कॅबिनेट

raj thackeray rally mumbai assembly election 2019

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अखेर शॅडो कॅबिनेटची घोषणा आज सोमवारी (९ मार्च ) रोजी केली. राज्य सरकारवर अंकूश ठेवण्यासाठी प्रतिरुपमंत्रिमंडळाची म्हणजेच शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. कुणी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा असा इशाराही राज यांनी कार्यकर्त्यांना दिला.

मनसेचा आज १४ वा वर्धापनदिवस आहे. यावेळी राज ठाकरे यांनी शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. सरकारवर वचक ठेवण्यासाठी आणि विधायक काम करण्यासाठी हे मंत्रिमंडळ आहे. यात कुणी परस्पर निर्णय घेऊन माध्यमांना सांगू  नये, कारण नसताना वाभाडे काढू नका, कुणी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा असा इशाराही त्यांनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिला.

प्रतिरूप मंत्रिमंडळाच्या बाबतीत पक्षाचे पदाधिकारी नसलात पण तुम्हाला एखाद्या विषयात काम करायची इच्छा असेल तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा. मी तुम्हाला ह्या कामात सहभागी करून घेईन असंही त्यांनी सांगितलं. सरकारवर वचक ठेवण्यासाठी आणि विधायक काम करण्यासाठी हे मंत्रिमंडळ आहे. यात कुणी परस्पर निर्णय घेऊन माध्यमांना सांगू  नये, कारण नसताना वाभाडे काढू नका, कुणी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा असा इशाराही त्यांनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिला.

असं आहे मनसेचं शॅडो कॅबिनेट…

वित्त आणि गृहनिर्माण – नितीन सरदेसाई

जलसंपदा – अनिल शिदोरे

गृह, विधी व न्याय, सामान्य प्रशासन – बाळा नांदगावकर

महसूल आणि परिवहन – अविनाश अभ्यंकर

सहकार आणि पणन – दिलीप धोत्रे

सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण – रिटा गुप्ता

शालेय उच्च शिक्षण – अभिजित पानसे

नगर विकास आणि पर्यटन – संदिप देशपांडे , अमित ठाकरे

कामगार – राजेंद्र वागसकर , गजानन राणे , सुरेंद्र सुर्वे

वने आपत्ती व्यवस्थापन , मदत पुनर्वसन – अमित ठाकरे , संजय चित्रे , संतोष धुरी

ग्रामविकास – अमित ठाकरे

उर्जा – शिरीष सावंत , सागर देवऱह

सांस्कृतिक कार्य – अमेय खोपकर

रोजगार हमी आमि फलोत्पादन – बाळा शेडगे

सार्वजनिक उपक्रम – संजय शिरोडकर

सार्वजनिक बांधकाम – योगेश परुळेकर

सामाजिक न्याय – गजानन काळे

महिला बालविकास – शालिनी ठाकरे , सुनीता चुरी

अन्न नागरी पुरवठा – राजा चौघुले

उत्पादन – वसंत फडके

आदिवासी विकास – आनंद एंबडवार

पर्यावरण – रुपाली पाटील, किर्तीकुमार शिंदे, देवव्रत पाटील

पाणी पुरवठा – अरविंद गावडे

केतन जोशी – सामान्य प्रशासन आणि इतर महत्त्वाचे विभाग

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments