Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईप्रवाशांचे प्रचंड हाल; रेल्वे स्थानकांवर तुफान गर्दी

प्रवाशांचे प्रचंड हाल; रेल्वे स्थानकांवर तुफान गर्दी

Central railway Megablock,Central, railway, Megablock
Image : Hindustan Times

मुंबई : नाताळच्या सुट्टी निमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले. त्यामुळे लोकल खचाखच भरून जात आहेत. तर दुसरीकडे मध्य रेल्वेने आज ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचे काम करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

मेगाब्लॉकमुळे कल्याण ते डोंबिवली दरम्यानची रेल्वे वाहतूक सकाळी १० ते दुपारी २ च्या दरम्यान बंद राहणार आहे. मात्र मध्य रेल्वेने घेतलेल्या ब्लॉकमुळे डोंबिवली ते ठाणे स्थानकांवरील प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून तुफान गर्दी झाली आहे. मध्य रेल्वेने १० वाजण्याआधीच मेगाब्लॉक सुरु केल्याचं काही प्रवाशांचं म्हणणं असून स्थानकांवर कोणतीही घोषणा करण्यात येत नसल्याची माहिती दिली आहे.

डोंबिवली स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असून स्टेशन प्रबंधक कार्यालयाबाहेर प्रवाशांनी गोंधळ घातला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या धीम्या लोकल नसल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत.

नाताळच्या सुट्टीचे निमित्त साधत मध्य रेल्वेने आज ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचे काम करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. मेगाब्लॉकमुळे कल्याण ते डोंबिवली दरम्यानची रेल्वे वाहतूक सकाळी १० ते दुपारी २ च्या दरम्यान बंद राहणार आहे. मात्र मध्य रेल्वेने घेतलेल्या ब्लॉकमुळे डोंबिवली ते ठाणे स्थानकांवरील प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून तुफान गर्दी झाली आहे. मध्य रेल्वेने १० वाजण्याआधीच मेगाब्लॉक सुरु केल्याचं काही प्रवाशांचं म्हणणं असून स्थानकांवर कोणतीही घोषणा करण्यात येत नसल्याची माहिती दिली आहे.

डोंबिवली स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असून स्टेशन प्रबंधक कार्यालयाबाहेर प्रवाशांनी गोंधळ घातला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या धीम्या लोकल नसल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. यामुळे मुंबईतील लोकलेवा विस्कळीत झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments