Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeदेशनागरिकत्व विधेयक ऐतिहासिक आणि देशहिताचं : पंतप्रधान

नागरिकत्व विधेयक ऐतिहासिक आणि देशहिताचं : पंतप्रधान

citizenship amendment bill is historic says pm modi at bjp parliamentary meetingनवी दिल्ली : संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी खासदारांना नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत जनजागृती करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. या विधेयकावरून काही विरोधी पक्ष पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

हे विधेयक ऐतिहासिक आणि देशहिताचं आहे हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवा, असे आदेशही त्यांनी खासदारांना दिले. या विधेयकामुळं शेजारी देशांमधील पीडित अल्पसंख्याकांना न्याय मिळेल. हे विधेयक ऐतिहासिक असंच आहे, असंही ते म्हणाले. लोकसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. आता राज्यसभेत ते मांडण्यात येणार आहे. ते मंजूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments