Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसिडकोचा महागृहनिर्माण प्रकल्प इतरत्र हलवा : सचिन सावंत

सिडकोचा महागृहनिर्माण प्रकल्प इतरत्र हलवा : सचिन सावंत

शिष्टमंडळाची नगरविकास मंत्र्यांकडे मागणी!

Cidco Eknath Shinde,Cidco, Eknath Shinde,Shinde, Eknathमुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवी मुंबईत होत असलेल्या ९५ हजार घरांच्या प्रकल्पाला स्थानिकांचा आक्षेप आहे. सिडकोने हा प्रकल्प इतर जागेवर हलवावा अशी स्थानिकांची मागणी आहे. याप्रकरणी काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांच्या शिष्टमंडळाने आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या प्रकल्पावर असलेले आक्षेप व भ्रष्टाचार त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिल्याची माहिती सचिन सावंत यांनी दिली आहे.

कामोठे, खारघर व खांदेश्वर येथील नागरिकांवर अन्याय करणारा प्रकल्प…

सिडकोमार्फत होणारा प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रकल्प कामोठे, खारघर व खांदेश्वर येथील नागरिकांवर अन्याय करणारा आहे. नरेंद्र मोदींना निवडणूकीआधी उद्घाटन करण्यासाठी सिडकोने घाईघाईने सिडकोच्या माथी हा प्रकल्प मारण्यात आला. या प्रकल्पासाठी भूखंडांवरील नागरी सुविधांचे आरक्षण जनसुनावणी न घेता बदलण्यात आले. नागरीकांची कुचंबणा होत आहे. खांदेश्वर वसाहतीमधील प्रकल्पाच्या जागेवर बस स्थानक होणार होते, तेथे हा प्रकल्प होत असल्याने नागरिकांचा विरोध आहे तर रोडपाली गावाजवळ होत असलेल्या या गृहनिर्माण प्रकल्पामुळे तेथे असलेले एकमेव मैदान बंद होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली.

Cidco Eknath Shinde,Cidco, Eknath Shinde,Shinde, Eknath

महागृहनिर्माण प्रकल्पाला आरक्षण बदलासाठी नगरविकास विभाग, पर्यावरण विभागाची परवानगी नसतानाही कंत्राटदारांना निवडणूक आचारसंहिता लागू होण्याच्या काही दिवसांपूर्वी एकूण १८ हजार ८७८ कोटी रुपयांच्या पाच टक्के आगाऊ रक्कम म्हणजेच सुमारे साडेआठशे कोटी रुपये वाटण्यात आल्याचे सचिन सावंत यांनी निदर्शनास आणून दिले.

या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत, स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधी तसेच सिडकोचे अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments