Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रछत्रपती शिवरायांची तुलना विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही; भाजपने भूमिका स्पष्ट करावी...

छत्रपती शिवरायांची तुलना विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही; भाजपने भूमिका स्पष्ट करावी : संजय राऊत

shivsena mp sanjay raut

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजचे शिवाजी महाराज आहेत, या पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली भाजप कार्यालयात प्रकाशन करण्यात आले. यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना या विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही.. एक सुर्य..एक चंद्र आणि एकच शिवाजी महाराज…छत्रपती शिवाजी महाराज… असं ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. महाराष्ट्र भाजपाने यावर भूमिका सपष्ट करावी. असा सवालही राऊत यांनी केला आहे.

शनिवारी दिल्लीमध्ये ‘‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, माजी खासदार महेश गिरी, प्रभारी श्याम जाजू, या नेत्यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. भगवान गोयल यांनी फेसबुक व ट्वीटरवरुन पोस्ट करत ही माहिती दिली.

यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सातारा गादीचे वारसदार श्रीमंत ऊदयन राजे श्रीमंत शिवेंद्रराजे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का? शिवरायांचया वंशजांनो बोला.. काहीतरी बोला.. असाही सवाल राऊत यांनी ट्विटव्दारे केला आहे.

जय भगवान गोयल आधी शिवसेनेत होते. महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. शिवाजी महाराजाचा एकेरीत ऊललेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजां बरोबर केली हे भाजपात शिरलेलया छत्रपतीचया वंशजांना मान्य आहे का?

आज के शिवाजी नरेंद्र मोदी.. असे महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महशय कोण आहेत? हेच ते जयभगवान गोल. यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला व मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा!!! असं ट्विट केलं आहे.

या सर्व विषयावरून चांगलाच वाद तापला आहे. या सर्व प्रकरणावरून भाजपची कोंडी झाली आहे. मात्र, अद्यापही भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली नाही. यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments