Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसत्तेची खुर्ची माझ्यासाठी नवीन नाही : उध्दव ठाकरे

सत्तेची खुर्ची माझ्यासाठी नवीन नाही : उध्दव ठाकरे

Uddhav Thackeray will take oath as CMमुंबई : शिवसेनाप्रमुखांनी जी सत्ता किंवा हुकुमत गाजवली ती मी जवळून बघितली आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो की, सत्तेची खुर्ची ही माझ्यासाठी नवीन असली तरी सत्ता माझ्यासाठी नवीन नाही. असं शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना पक्षप्रमुख, उध्दव ठाकरे यांना अनुभव नाही. त्यांना राज्याचा कारभार करता येणान नाही अशी टीका त्यांच्यावर झाली होती. मात्र त्या सर्व टीकाकारांना उत्तर देतांना उध्दव ठाकरेंना आपली भूमिका स्पष्ट केली. उध्दव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्रीपद स्वीकारणं हा माझ्यासाठी धक्का नसला तरी माझं हे स्वप्न कधीच नव्हतं. अत्यंत प्रामाणिकपणानं हे मी कबूल करतो की, मी शिवसेनाप्रमुखांचं एक स्वप्न मग त्याच्यात निर्मिती असेल, शिवसेनेची वाटचाल असेल आणि माझ्यापुरतं म्हणाल तर ती म्हणजे स्वत: उध्दव याने त्याच्या वडिलांना म्हणजे बाळासाहेबांना दिलेलं वचन! त्या वचनपूर्तेतेसाठी मी कोणत्याही थराला जायचं ठरवलं होतं. त्याही पुढे जाऊन मी एक गोष्ट स्पष्ट करतो, मी माझं मुख्यमंत्रीपद ही वचनपूर्ती नाही, तर वचनपूर्तीच्या दिशेने टाकलेलं ते एक पाऊल आहे. असंही उध्दव ठाकरे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments