Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमराठवाडापरभणीभाजपच्या नेत्यांचा CAA ला विरोध,पक्षातून हकालपट्टी!

भाजपच्या नेत्यांचा CAA ला विरोध,पक्षातून हकालपट्टी!

Within five years, the wealth of BJP ministers increasedपरभणी : परभणी येथील पालम नगरपरिषदचे नगराध्यक्ष बाळासाहेब गणेश रोकडे व सेलू नगर परिषदेचे नगराध्यक्ष विनोद हरीभाऊ बोराडे यांनी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) च्या अंमलबजावणीविरोधात एकमताने ठराव मंजूर केला होता. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही नेत्यांची हकालपट्टी केली.

भाजपाची सत्ता असलेल्या नगरपालिकेत सीएए, एनआरसी आणि एनपीआरविरोधात ठराव संमत करण्यात आला होता. तसंच तो ठराव केंद्रालाही पाठवण्यात आला. यावरून अनुशासनाचं कारण देत पक्षानं पालम नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बाळासाहेब गणेश रोकडे आणि सेलू नगर परिषदेचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांना पक्षातून निष्कासित करण्यात आलं आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत घोषणा केली.

भाजपच्या पदाधिका-यांनी प्रस्ताव केला होता मंजूर…

भाजपाची सत्ता असलेल्या परभणी जिल्ह्यातील सेलू नगरपरिषदेत सर्वसंमतीने सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) च्या अंमलबजावणीविरोधात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला होता. “हा प्रस्ताव २८ फेब्रुवारी रोजी कोणाचाही विरोध न होता पारीत झाला. नगरपरिषदेत २७ नगरसेवक आहेत व तीन सहस्वीकृत सदस्य आहेत,” असं बोराडे यांनी सांगितलं होतं. “स्थानिक लोकप्रतिनिधी या निर्णयाच्या बाजूने होते. प्रस्ताव पारीत होण्याच्या दोन दिवस अगोदर एक बैठक बोलवण्यात आली होती. ज्याची मागणी काँग्रेस, राष्ट्रवादीचे सदस्य व मुस्लीम समुदायाच्या सात नगरसेवकांकडून करण्यात आली होती,” असंदेखील त्यांनी नमूद केलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments