Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeदेशकोरोनाचा फटका : ‘या’ दोन सामन्यांसाठी प्रेक्षकांना मैदानावर बंदी!

कोरोनाचा फटका : ‘या’ दोन सामन्यांसाठी प्रेक्षकांना मैदानावर बंदी!

India South Africa Coronavirus,India, South Africa, Coronavirusनवी दिल्ली : जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसत आहे. पावसामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना रद्द झाला होता. आता करोना व्हायरसच्या वाढत्या धोक्यामुळे मालिकेतील दोन सामने चाहत्यांना घरी बसूनच पाहावे लागतील. याबाबतचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने घेतला आहे.

या तारखेला होणार सामने…

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा आणि तिसरा सामना रिकाम्या मैदानात म्हणजेच प्रेक्षकांशिवाय खेळवला जाणार आहे. दोन्ही संघादरम्यान १५ मार्च रोजी दुसरी वनडे लखनऊ येथे तर १८ मार्च रोजी कोलकाता येथे तिसरी वनडे खेळवली जाणार आहे. या दोन्ही सामन्यांसाठी प्रेक्षकांना मैदानावर प्रवेश दिला जाणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

करोना व्हायरसमुळे सरकारने बीसीसीआयला सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्याचे आदेश दिले होते. फक्त क्रिकेटच नाही तर क्रीडा सामने देखील प्रेक्षकांशिवाय घेतले जात आहेत. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि प्रत्येक राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. केंद्राच्या आदेशानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील कोरनाला आपत्ती म्हणून जाहीर केले. बीसीसीआय बरोबरच उत्तर प्रदेश सरकारने दुसऱ्या सामन्यासाठी प्रेक्षकांना मैदानावर प्रवेश दिला जाणार नाही असे स्पष्ट केले आहे.

तपासणीनंतर प्रवेश…

मैदानावर फक्त कॅमेरा टीम, वैद्यकीय अधिकारी, स्टेडियमधील कर्मचारी यांनाच प्रवेश दिला जाईल. हा प्रवेश देखील तपासणी केल्यानंतरच दिला जाणार असल्याचे उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments