Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकोरेगाव-भीमा : तेलतुंबडे, नवलखांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

कोरेगाव-भीमा : तेलतुंबडे, नवलखांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Bhima Koregaon Navlakha Teltumbde,Bhima Koregaon, Gautam Navlakha, Teltumbde,Bhima, Koregaon, Navlakha, Teltumbdeमुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा आणि प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोघांना अटकेपासून चार आठवड्यांचं संरक्षण देण्यात आलं आहे.

न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. जानेवारी २०१८ मध्ये पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी पुणे पोलिसांनी नवलखा, तेलतुंबडे व अन्य काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या सर्व आरोपींचे नक्षवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे.

काय होता ठपका….

डिसेंबर २०१७ मध्ये पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषणं देण्यात आली होती. या भाषणांनंतर दुसऱ्याच दिवशी कोरेगाव-भीमामध्ये हिंसाचार उसळला होता. या परिषदेला नक्षलवाद्यांचा पाठिंबा होता, असा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.

पुणे सत्र न्यायालयानं मागील वर्षीच्या नोव्हेंबर तेलतुंबडे व नवलखांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. डिसेंबरमध्ये उच्च न्यायालयानं त्यांना अटकेपासून संरक्षण देताना जामिनावरील निर्णय पुढं ढकलला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments