Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्याअमित शाह म्हणाले, या कारणामुळे अजित पवारांना सोबत घेतलं

अमित शाह म्हणाले, या कारणामुळे अजित पवारांना सोबत घेतलं

amit shah said, For this reason we took Ajit Pawar with asमुंबई : महाराष्ट्रातील भाजपच्या गुपचूप शपधविधीनंतर 79 तासानंतर भाजप सरकार कोसळलं. त्यानंतर भाजपची नाचक्की झाली. या सर्व घडामोडींवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते असल्यानं भाजपनं त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, असं शहा यांनी सांगितलं.

भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांनी माघार घेऊन राजीनामा दिल्यामुळं भाजपचं सरकार अवघ्या 79 तासांत कोसळलं. त्यानंतर आता राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन होत आहे. नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्या गुरुवारी शपथ घेणार आहेत.

अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना यावर भाष्य केलं. ‘अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे नेते होते. सरकार स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना होता. भाजपला पाठिंबा देताना राज्यपालांनी स्वत: त्यांच्याशी चर्चा केली होती. राष्ट्रवादीनं सुरुवातीला जेव्हा सरकार बनविण्यास असमर्थता व्यक्त केली होती. तेव्हा राज्यपालांना दिलेल्या पत्रावर अजित पवार यांचीच सही होती. आमच्या समर्थनासाठी त्यांनी दिलेल्या पाठिंबा पत्रावर देखील त्यांची सही होती. त्यामुळं आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला,’ असं ते म्हणाले.

अजित पवारांवर आरोप असलेल्या कुठल्याही प्रकरणाची फाइल बंद करण्यात आलेली नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. भाजप आता सारवासारव करत आहे. परंतु भाजपची खेळी फसल्यामुळे चांगलीच नाचक्की झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments