Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईआदित्य ठाकरेंचं नोटाबंदी-जीएसटीवरून भाजपला आव्हान!

आदित्य ठाकरेंचं नोटाबंदी-जीएसटीवरून भाजपला आव्हान!

Aaditya Thackeray Devendra Fadnavis,Aaditya Thackeray, Devendra Fadnavis,Aaditya, Thackeray, Devendra, Fadnavis,Night Life,Mumbai Night Life,Mumbai Club,Night,Life,Club

मुंबई  : पर्यटन आणि पर्यावरण मंत्री यांच्या ‘नाईट लाईफ’ संकल्पनेवरुन भाजप नेत्यांनी हल्लाबोल केला आहे. याला आदित्य ठाकरेंनी जोरदार उत्तर दिलं आहे. भाजपच्या नेत्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी केंद्र सरकारला नोटाबंदी, जीएसटीसारख्या निर्णयांबद्दल विचारुन दाखवा. असं आव्हानं केलं आहे.

आदित्य ठाकरे यांच्या ‘नाईट लाईफ’ च्या संकल्पनेवर २६ जानेवारीपासून मुंबईमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये बीकेसी, नरिमन पॉईंट, कालाघोडा या ठिकाणचे हॉटेल, पब, मॉल्स, थिएटर २४ तास खुले राहणार आहेत. याला भाजपकडून विरोध होत आहे. त्यानंतर आज बुधवार (२२ जानेवारी) बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, विरोधकांच्या टीकेला उत्तर द्यावं असं वाटत नाही. मन दूषित असेल तर दृष्टीकोनही तसाच असतो. महाराष्ट्रातील जनतेचं मन स्वच्छ आहे. दुकाने रात्री उघडी राहिल्याने फायदा होईल. रोजगाराची संधी निर्माण होईल. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेत आहेत. असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

भाजपकडून नाईट लाईफला होत आहे विरोध…

नाईट लाईफ वरून मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष आमदार आशिष शेलार, राज पुरोहित, राम कदम यांच्यासह अनेक नेत्यांनी विरोध केला आहे. मात्र, प्रायोगिक तत्वावर २६ जानेवारीपासून नाईट लाईफ संकल्पनेवर काही ठिकाणी बीकेसी, नरिमन पॉईंट, कालाघोडा या ठिकाणचे हॉटेल, पब, मॉल्स, थिएटर २४ तास खुले राहणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments