Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्याआजच्या घडामोडी

आजच्या घडामोडी

#NewsAlerts
1). मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन, मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात अखेरचा श्वास

2). मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भातील अहवालाचे परिशिष्ट हायकोर्टात सादर
राज्य सरकारने पेन ड्राईव्हच्या माध्यमातून राज्य मागास प्रवर्ग आयोगाच्या अहवालाचे परिशिष्ट केले सादर
सर्व प्रतिवादी आणि याचिकाकर्ते सरकारी वकिलांच्या कार्यालयातून पेन ड्राईव्हची कॉपी मिळवू शकतात

3). मुंबई महापालिकेचं बजेट सादर

– करवाढ नाही, नवे कर प्रस्तावित नाहीत
– महापौरांना पुन्हा नवे घर मिळणार
– बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी 5 कोटींची तरतूद

4). शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलवली, मंगळवारी सकाळी 11 वाजता मातोश्रीवर बैठक, खासदारांसोबत लोकसभा निवडणुकीवर चर्चा होणार

5). मुख्यमंत्री धरणे आंदोलन करताहेत ही गंभीर बाब- संजय राऊत
-प. बंगालमधील या परिस्थितीवर बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी एका मोठ्या राज्याचे मुख्यमंत्रीच धरणे आंदोलनासाठी बसणे ही बाब गंभीर असून देशाच्या आणि तपास यंत्रणांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याचे म्हटले आहे…. वाचा सविस्तर…

6). भाजपच्या खासदार पुनम महाजन यांनी पवार साहेबांबाबत केलेले विधान हे सत्ता डोक्यात गेल्याचे लक्षण , येत्या निवडणुकांमध्ये जनताच यांना धडा शिकवेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मा. सचिन अहिर यांनी केली आहे.

7). मुंबईच्या महापौरांना पुन्हा नवं घर मिळणार, दादरच्या शिवाजी पार्क इथे महापौरांचं नवं निवासस्थान बांधणार

8). मुंबई महापालिकेचं अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर
2019-20 साठी मुंबई महापालिकेचं 30 हजार 692 कोटींचं बजेट

9). शिवसेना-भाजपच्या युतीची बोलणी अंतिम टप्प्यात, सूत्रांची माहिती
-भाजपाकडून शिवसेनेला 25-23चा प्रस्ताव;
-चर्चे दरम्यान, शिवसेनेने भिवंडी जागेसाठी आग्रह धरल्याचे समजते. शिवसेनेने पालघर जागा देखील मागितली होती. पण भाजपने ही जागा आपल्यालाच हवी असल्याचे सांगितले.

10). केजरीवाल भेटीसाठी का आले नाहीत? आता आले, तरी स्वागतच, मात्र व्यासपीठावर स्थान नाही : अण्णा हजारे
-मागण्या मान्य होत नाहीत तोवर उपोषण मागे घेणार नाही- अण्णा हजारे

11). पुणे: राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील रिद्धी वाघिणीने जन्म दिलेले बछडे
-पुणे: राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील रिद्धी वाघिणीने चार बछड्यांना दिला जन्म; महापौरांनी उद्यानाला दिली भेट

12). आगीत होरपळून या 3 चिमुरड्यांचा झाला मृत्यू, जालन्यातली डोळ्यात अश्रू आणणारी घटना
गुरांच्या गोठ्यामध्ये ही लहान मुलं खेळत होती. अचानक गोठ्याला आग लागली.

13). राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचा आणखी एक मास्टर स्ट्रोक…
मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; राज्यात 1 फेब्रुवारीपासून सवर्णांना 10 टक्के आरक्षण
महाराष्ट्र सरकारने राज्यात सवर्णांना 10 टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

14). मायावतींच्या वक्तव्यामुळे काँग्रेस सरकारसाठी धोक्याची घंटा, होऊ शकते कर्नाटकसारखी परिस्थीती

15). ममता बॅनर्जींच्या धरणे आंदोलनाला राहुल गांधी ते शरद पवारांपर्यंत दिग्गजांनी दिला पाठिंबा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments