Wednesday, June 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई‘स्‍वच्‍छता सर्वेक्षण – २०१९’ अंतर्गत ‘एन’ विभागातर्फे पथनाटय़ाचे आयोजन

‘स्‍वच्‍छता सर्वेक्षण – २०१९’ अंतर्गत ‘एन’ विभागातर्फे पथनाटय़ाचे आयोजन

     बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या एन’ विभाग अंतर्गत घाटकोपरमध्‍ये सार्वजनिक आरोग्‍य समितीच्‍या अध्‍यक्षा तथा स्‍थानिक नगरसेविका श्रीमती अर्चना भालेराव यांच्‍या प्रमुख उपस्थितीत  घन कचरा व्‍यवस्‍थापन विभागामार्फत ‘स्‍वच्‍छता अभियान’ अंतर्गत पथनाटय़ाचे (दिनांक १५ जानेवारी, २०१९) आयोजन करण्‍यात आले. कार्यक्रम दरम्‍यान स्‍थानिक नागरिकांना व शालेय विद्यार्थ्‍यांना स्‍वच्‍छतेबाबत प्रबोधन व जनजागृती करण्‍यात आली.    

          स्‍वच्‍छता अभियान अंतर्गत मुंबई व उपनगरांत विविध प्रबोधन व जनजागृतीचे कार्यक्रम घेण्‍यात येत आहेत. एन’ विभाग अंतर्गत विविध ठिकाणी साधारणतः २५ पेक्षा जास्‍त पथनाटय़ाचे आयोजन करण्‍यात आले. या पथनाटय़ातून नागरिकांना सुका कचरा व ओला कचऱयाचे वर्गीकरण करणेविविध पद्धतीचा वापर करुन ओल्‍या कचऱयापासून खत निर्मिती करणे तसेच स्‍वच्‍छता सर्वेक्षण  २०१९’ अंतर्गत राबविण्‍यात येणाऱया विविध उपक्रमांमध्‍ये सहभागी होण्‍याचे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्‍यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments