Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे निधन

ज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे निधन

Dilip Kolhatkarपुणे: ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे शुक्रवारी सकाळी पुण्यात निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांची ‘कवडी चुंबक’, ‘राजाचा खेळ’, ‘मोरूची मावशी’, ‘उघडले स्वर्गाचे दार’ ही नाटके गाजली होती. दर्जेदार नाटकांनी मराठी नाट्यसृष्टीला नव्या उंचीवर नेणारे ज्येष्ठ नाट्दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवारी सकाळी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

दिलीप कोल्हटकर यांचा मुलगा अमेरिकेवरुन रात्री उशिरापर्यंत पुण्यात येणार आहे. शनिवारी कोल्हटकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. मराठी रंगभूमीवर करड्या शिस्तीचे दिग्दर्शक म्हणून ते ओळखले जात होते. शेजारी शेजारी आणि ताईच्या बांगड्या या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. रंगभूमीवर कवडी चुंबक, राजाचा खेळ, मोरुची मावशी, बिघडले स्वर्गाचे दार ही त्यांची नाटके प्रेक्षकांना भावली होती. मराठी रंगभूमीवर ठसा उमटवणाऱ्या दिलीप कोल्हटकर यांच्या निधनावर हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments