सनी लिओनीने इन्स्टाग्रामवर एक कौटुंबिक फोटो पोस्ट केला आहे ज्यात ती पती डॅनियल वेबर, मुलगी निशा आणि जुळी मुले नोह आणि अशर यांच्यासोबत दिसतेय. घराबाहेर पडण्यापूर्वी कोरोनाव्हायरसच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाने मास्क घातले आहेत. सनीने हे छायाचित्र शेअर करताना निराशा व्यक्त केली आहे.
तिने लिहिले, एक नवीन काळ! मुलांना असे जगावे लागत आहे, हे फार दुर्दैवी आहे पण ते आवश्यक आहे. मास्क कसा घालायचा, हे मुलांना शिकवण्याचा पहिला दिवस. छायाचित्रात सनी आणि डॅनियल काळ्या रंगाचे मास्क आणि तिन्ही मुले रंगीत मास्क घालून दिसत आहे. सनीला मोठी मुलगी निशा असून ती ३ वर्षांची आहे. सनी-डॅनियल यांनी निशाला दत्तक घेतले होते. त्याच वेळी नोह आणि अशर दोन वर्षांचे आहेत ज्यांचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे.
सनीला घरी राहून का आला कंटाळा…
यापूर्वी सनीने एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये ती एका गाण्यावर मजेशीर एक्सप्रेशन्स देताना दिसली होती आणि तिच्या शेजारी वाइनचा ग्लास होता. सनीने व्हिडिओ पोस्ट करुन म्हटले होते की, कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे ती घरात आहे आणि कंटाळा आला आहे. वास्तविक, कोरोनामुळे, बॉलिवूडने ३१ मार्चपर्यंत सर्व चित्रपटांचे आणि कार्यक्रमांचे शूटिंग थांबविले आहे.