Sunday, May 5, 2024
Homeमनोरंजनचाचा चौधरी मालिकेतील राजेश सिंह 'सिस्टर्स' मध्ये झळकणार

चाचा चौधरी मालिकेतील राजेश सिंह ‘सिस्टर्स’ मध्ये झळकणार

छोट्या पडद्यावर आपल्या अदाकारीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे अभिनेता राजेश सिंह आता प्रेक्षकांना चित्रपटात मुख्य  नायकचे भूमिकेत दिसणार आहेत. हॉलीवूड प्रमाणे निर्मित होणाऱ्या बॉलीवूड मध्येसिस्टर्स‘ नामक चित्रपटात राजेश सिंह या प्रमुख भूमिकेत आहेत. शिवानंद एन्टरटेनमेंट अँड ड्रीम वर्ल्ड फिल्म प्रोडक्शन निर्मिती असलेल्या सिस्टर्सलवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सहा फुट चार इंच उंच व डोळ्यात भरणारी शरीरयष्टी असणाऱ्या सिंह यांनी टीव्ही वर कायम लक्षात राहणाऱ्या मालिकांमध्ये काम केले आहे.चाचा चौधरी मध्ये साबू , ब्रम्हा विष्णू महेश मध्ये रावण, तर जय हनुमान मध्ये भीमाची भूमिका साकारून आपल्या अभिनयाची अमिट छाप सिंह यांनी सोडली आहे.’सिस्टर्स’ चे दिग्दर्शन निशांत-विकास असून सिंह यांच्या समवेत डोलप सिंह, नंदनी सिंह,खुश्बू खान,मिसमी विश्वास,सलोनी पांडे आदी कलाकारांच्या ग्लॅमरस आणि बोल्ड भूमिका आहेत.सध्या सिस्टर्स चे चित्रीकरण नैनिताल येथे सुरु असून हा चित्रपट हिंदी बरोबरच अन्य विदेशी भाषांमध्ये ही प्रदर्शित होणार आहे.

अभिनेता राजेश सिंह यांनी ‘सिस्टर्स’ बद्दल बोलताना सांगितले कि, मी या मध्ये पोलीस आयुक्त राजेश आहुजा ची भूमिका साकारत आहे. हा पोलीस अधिकारी म्हणजे आपल्या कामा शी अत्यंत प्रामाणिक व निष्ठावान आहे,चित्रपटात सुप्रिया कर्णिक माझ्या पत्नीची भूमिका साकारत असून टी एक न्यायाधीश आहे.तसेच माझ्या भावाची भूमिका आर्य बब्बर निभावत असून तो एका रेप केस मध्ये फसला आहे. अत्यंत क्लिष्ट अशी बनलेल्या केस मध्ये पुढे काय काय होते ? हे ‘सिस्टर्स’ मध्ये दाखविण्यात आले आहे. फिल्म सस्पेन्स असल्याने अधिक काही कथानका बद्दल सांगू शकत नसल्याचे राजेश यांनी सांगितले. मात्र हॉलीवूड पटा सारखीच बिग बजेट फिल्म असल्याचे विशेष नमूद केले. सिंह यांनी वजूद, हलचल , जमानत, आगे से राईट आदी चित्रपटात दुय्यम भूमिका साकारल्या आहेत,मात्र ‘सिस्टर्स’ मध्ये त्यांची प्रमुख भूमिका आहे.राजेश यांनी अनेक नाटक , फिल्म,मालिका,जाहिरातींमध्ये काम केले आहे. महेश भट्ट यांच्या नामकरण मालिकेतही राजेश यांनी काम केले होते तर कलर्स वाहिनीवरील “इश्क मर जावा ” सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments