Wednesday, May 1, 2024
Homeमनोरंजनराधिका आपटेने ‘या’अभिनेत्याच्या थोबाडीत का मारले!

राधिका आपटेने ‘या’अभिनेत्याच्या थोबाडीत का मारले!

radhika apte, actress, celebrity

मुंबई : बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेंनी काल धक्कादायक खुलासा केला आहे. बॉलिवूड मराठीसह साऊथ चित्रपटांमध्ये अभिनय करणाऱ्या राधिका आपटेला शुटींग दरम्यान नुकताच एका वाईट अनुभव आला. पहिल्याच दिवशी अभिनेत्याने पायाला गुदगुल्या केल्या होत्या त्यावेळी मी त्याच्या थोबाडीत मारली होती. असा खुलासा एका कार्यक्रमात राधिकाने केला आहे. 

एका तामीळ सिनेमात काम करत असताना हा प्रसंग घडला होता. या कार्यक्रमात ती म्हणाली,  सेटवर माझा पहिला दिवस होता. पण एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याने माझ्या पायाला गुदगुदल्या करण्यास सुरुवात केली. मला धक्का बसला. सिनेमाच्या आधी आम्ही कधीच भेटलो नव्हतो. तरीही तो अभिनेता असा प्रकार कसा काय करु शकतो? मी त्याच वेळी त्याला थोबाडीत मारली, असं राधिका आपटेने सांगितले.

राधिका अलीकडे नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये पोहोचली. या शोमध्ये राधिकाने नेहाच्या प्रश्नांना बरीच मजेशीर उत्तरे दिलीत. यावेळी अभिनेता राजकुमार राव हाही तिच्यासोबत होता. बॉलिवूडचा सर्वात ओव्हररेटेड अ‍ॅक्टर कोण? असा प्रश्न राधिकाला विचारण्यात आला. यावर राधिकाने क्षणाचाही विचार न करता अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे नाव घेतले.  कुठल्या अभिनेत्याला जिम सेशनपेक्षा अ‍ॅक्टिंग क्लासेसची गरज आहे? असा आणखी एक प्रश्नही राधिकाला विचारण्यात आला. यावर राधिकाने सूरज पांचोलीचे नाव घेतले. राधिकाने एकीकडे अतिशय धीटाईने या प्रश्नांना उत्तरे दिलीत. याऊलट राजकुमार राव  काहीसी सावध भूमिका घेत, अनेक प्रश्न चतुराईने टाळताना दिसला. त्याने कुठल्याही सहकलाकाराचे नाव घेणे टाळले. तूर्तास राजकुमार राव ‘फन्ने खां’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन आणि अनिल कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

राधिका आपटेचा नुकताच अक्षय कुमार सोबत आलेल्या पॅडमॅन चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. समीक्षक आणि प्रेक्षकांनी सिनेमासह राधिकाच्या अभिनयाचंही कौतुक केलं.  राधिका सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असते आणि फोटो-व्हिडीओ शेअर करते. काही दिवसांपूर्वीच बिकिनी घालून समुद्रकिनाऱ्यावर बसलेल्या फोटोमुळे तिला ट्रोल केलं होतं. बीचवर बिकिनी नाही तर साडी नेसणार का, असं उत्तर तिने ट्रोलर्सना दिलं होतं
२००५ मध्ये राधिकाने  वाह, लाईफ हो तो ऐसी  या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केले होते. यानंतर शोर इन द सिटी, कबाली, बदलापूर, मांझी- द माऊंटेन मॅन अशा अनेक चित्रपटांत राधिका दिसली आहे. हिंदी चित्रपटांशिवाय राधिकाने मराठी, तेलगू, तामिळ, मल्याळम चित्रपटातही काम केलेय. राधिकाची गणना मेनस्ट्रीम सिनेमाच्या टॉप मोस्ट अभिनेत्रींमध्ये होत नसली तरी तिची एक वेगळी फॅन फॉलोर्इंग आहे. दमदार अभिनयासाठी राधिका ओळखली जाते. तशीच एक बोल्ड अ‍ॅक्ट्रेस अशीही तिची ओळख आहे. तिच्या अनेक बोल्ड फोटोशूट आणि सीन्सवर वादंग माजले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments