आयुष्मान खुराना आता त्याच्या आगामी शुभ मंगल ज्यादा सावधान सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. सिनेमाच्या नावावरून आणि पोस्टरवरूनच हा सिनेमा एक सामाजिक संदेश देणारा असेल याचा अंदाज प्रेक्षकांना आधीपासून होता. या सिनेमात आयुष्मान खुराना पहिल्यांदा समलैंगिक मुलाची भूमिका वठवताना दिसणार आहे.
ट्रेलर प्रदर्शित करण्यापूर्वी आयुष्मानने सिनेमाचे काही पोस्टर प्रदर्शित केले होते. या पोस्टरला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, ‘कार्तिक का प्यार होकर रहेगा अमन! ‘ नवीन पोस्टरमध्ये सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट दिसते. यात नीना गुप्ता, गजराज राव, जितेंद्र कुमार, मनुऋषि चड्ढा, सुनीता रजवार, मानवी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.