Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनम्हणून ‘भाभीजी’ शिल्पा शिंदे लग्न न करता बॉयफ्रेंडपासून पळाली!

म्हणून ‘भाभीजी’ शिल्पा शिंदे लग्न न करता बॉयफ्रेंडपासून पळाली!

बिग बॉस सीझन अकरा आता उत्तरार्धाकडे चालला आहे. या सीझनमध्ये स्पर्धकांची भांडणं, त्यांच्यातील वाद, रोमान्स याचीही नेहमीच चर्चा होत आली आहे. मात्र आता चर्चा रंगली आहे ती म्हणजे बिग बॉस सीझन -११ चे विजेता कोण ठरणार याची. येत्या १४ जानेवारीला बिग बॉस सीझन ११चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे.या सीझनमध्ये सगळ्यात लोकप्रिय ठरलेली भाभीजी फेम अभिनेत्री शिल्पा शिंदे हिचे नाव बिग बॉसच्या विजेतेपदासाठी सगळ्यात आघाडीवर असल्याचे बोललं जात आहे.तसंच विकास गुप्ता आणि शिल्पा शिंदे यापैकी कुणीही बिग बॉस जिंकू शकतो असं काहींना वाटत आहे. बिग बॉसच्या या विजेतेपदाच्या चर्चांसोबत सध्या शिल्पा शिंदेच्या मोडलेल्या लग्नाच्या चर्चाही ऐकायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी शिल्पा शिंदे हिची आई गीता बिग बॉसच्या घरात आल्या होत्या. त्यांनी आपल्या प्रेमळ वागणुकीने सा-यांची मनं जिंकली होती. तसंच खेळ खेळा मात्र खेळताना इतरांचाही मान राखा तसंच शिल्पाशी चांगलं वागण्याची विनंतीही त्यांनी केली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर गीता यांनीही घरातल्या सगळ्या स्पर्धकांचं कौतुक केलं. सर्वजण गेम खेळत असून कुणाबद्दलही वाईट मत किंवा राग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. याच वेळी त्यांना शिल्पा शिंदेच्या लग्नाबाबत विचारणा करण्यात आली. शिल्पा आणि तिचा बॉयफ्रेंड रोमित राज यांनी 2008 साली लग्नाचा निर्णय घेतला होता. रोमित हा चांगला मुलगा होतो त्यामुळे हे नातं सा-यांना मान्य होतं अशी माहिती गीता यांनी दिली. मात्र काही दिवसांनंतर लग्न करु नये असं शिल्पा आणि रोमित या दोघांनाही जाणवलं. त्यामुळे घटस्फोट घेण्यापेक्षा आधीच वेगळे झालेले चांगलं असा विचार करुन त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला असंही गीता यांनी सांगितलं. यानंतर बरंच ऐकावं लागलं होतं अशी प्रतिक्रिया शिल्पानेही बिग बॉसच्या घरात दिली होती. लग्न असो किंवा कोणतीही गोष्ट दरवेळी पळ काढत असल्याचे तिने म्हटले होते. बिग बॉससोबत कॉन्ट्रॅक्ट असल्याने इथून पळ काढणं शक्य नसल्याचंही तिने हसत हसत मान्य केले होते. रोमित राजनेही शिल्पाला जीवनात प्रत्येक गोष्टीपासून कायम पळ काढण्याची सवय असल्याचं विधान केले होते. या सवयीमुळे तिचे वैयक्तीक आणि व्यावसायिक नुकसान होत आहे असं तो म्हणाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments