Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeविदर्भनागपूरसोमवारपासून हिवाळी अधिवेशन; विरोधक 'ठाकरे सरकारला' घेरणार

सोमवारपासून हिवाळी अधिवेशन; विरोधक ‘ठाकरे सरकारला’ घेरणार

thackeray Government releases maharashtra vikas aghadi minister's portfolioमहाराष्ट्र विकास आघाडी सरकारची सोमवारपासून सहा दिवस अग्नी परीक्षा होणार आहे. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी सत्ता स्थापन केली. उद्यापासून नागपुरात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचं हे पहिलं अधिवेशन असणार आहे. शेतकरी कर्जमाफी, स्थगित केलेले प्रकल्प, खातेपाटप यांसारख्या मुदद्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.

पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यास होणाऱ्या विलंबाबद्दलही भाजपने आक्रमक भूमिका घेण्याचं सुतोवाच केलं आहे. केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या अंमलबजावणीवरून शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातली दरी वाढवण्याचा भाजपचा अधिवेशनात प्रयत्न असेल. निवडणुकीपूर्वीची वक्तव्ये किंवा आश्वासनांची सत्ताधाऱ्यांना आठवण करून दिली जाईल असं भाजपने म्हटलं आहे.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष अर्थात भाजपनं सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी रणनिती आखलीय आहे. दरम्यान आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments