Wednesday, May 8, 2024
Homeविदर्भनागपूरसप्तर्षि पुरस्कार शृंखला 29 ऑक्टोबर रोजी नागपुरात होणार आहे

सप्तर्षि पुरस्कार शृंखला 29 ऑक्टोबर रोजी नागपुरात होणार आहे

हिंदू रिसर्च फाऊंडेशन, सन २००० पासून राष्ट्रीय स्तरावर काम करणारी मुंबई येथे पंजीबद्ध सार्वजनिक धर्मार्थ संस्था आहे. सदर संस्थेद्वारे हिंदू धर्माचे विविध स्तरावर कामे सुरू आहेत.

भारतीय संस्कृतीचे दुर्भाग्य की प्राचीन भारतातील ज्या ऋषि-मुनिंनी साहित्य, कला, विज्ञान व विज्ञान इत्यादि विविध क्षेत्रात अतिशय महत्वपूर्ण कामगिरी केली आहे परंतु त्यासंबंधी भारतीय समाज अनभिज्ञ आहे. त्यारूषी मुनींच्या कार्याची माहिती भरतीयास व विश्वास व्हावी या हेतूने त्यांचे नावे पुरस्कार देण्याचे ह्या संस्थेने निश्चित केले आहे.

भारतीय संस्कृतीतील अशा सात ऋषींच्या नांवे (यादी सोबत जोडली आहे) त्या त्या क्षेत्रात समस्त मानवकल्याणासाठी निरपेक्ष निस्वार्थ अजरामर योगदान व संशोधनाबाबत नोबेल पुरस्काराच्या धर्तीवर सप्तर्षि पुरस्कार शृंखला च्या माध्यमाने पुरस्कार देण्याची संकल्पना आहे.

सुरुवातीस भारतातील नामवंत/गणमान्य शात्रज्ञांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी अशा पुरस्काराने सन्मानित करून तद्नंतर विश्वस्तरावर हि योजना नेण्याचे ठरले आहे. जेणेकरून विज्ञानाच्या क्षेत्रातील प्राचीन युगातील आमच्या पूर्वजांनी केलेल्या कामाचा परिचय जगास करून देता येईल.

मागील वर्षी आचार्य भारद्वाज ह्या पुरस्काराने विकास इंजिन विकसित करून अंतराळ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे शास्त्रज्ञ पद्मभूषण श्री नांबी नारायनन यांना आचार्य भारद्वाज पुरस्काराने आणि रसायन शास्त्रात जागतिक कीर्ती मिळालेले व अद्वितीय कामगिरी करणारे पद्मविभूषण श्री रघुनाथ माशेलकर यांना नागार्जुन पुरस्काराने सन्मानित केले होते.

सदरचे दुसरे वर्ष आहे. यावर्षी साहित्य कला विज्ञान क्षेत्रातील खालील गनमान्य व्यक्तींना त्यांच्या नावासमोर दिलेल्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सदर पुरस्काराची राशी रुपये एक लाख व सन्मान पत्र प्रदान करून सत्कार करण्यात येणार आहे.

  1. पद्म विभूषण श्री इ श्रीधरण, मेट्रो मॅन – विश्वकर्मा पुरस्कार
  2. पद्म विभूषण डॉ श्री के कस्तुरीररंगन – आचार्य भारद्वाज पुरस्कार
  3. पद्म विभूषण डॉ श्री अनिल काकोडकर – आचार्य कनाद पुरस्कार
  4. पद्म भूषण डॉ श्री विजय भाटकर – आर्यभट पुरस्कार
  5. पद्म श्री डॉ जी डी यादव – नागार्जुन पुरस्कार
  6. डॉ श्री अनमोल सोनवणे, ठाकूर – सुश्रुत पुरस्कार
  7. महाकवी श्री सुधाकर गायधनी – महर्षि वाल्मिकी पुरस्कार

ज्या ऋषि मुनींच्या नांवे सदर पुरस्कार दिले जाणार आहेत त्याच्या कार्याची माहिती सोबत जोडली आहे. तसेच ज्या मान्यवरांना पुरस्कार दिले जाणार आहेत त्यांच्या कार्याचीही संक्षिप्त माहिती आपल्या अवलोकनार्थ सोबत जोडली आहे.

सदरचा कार्यक्रम रविवारी दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ ला सकाळी ११०० वा कविकुलगुरू कालिदास सभागृह, परसिस्टंट सिस्टम, आय टी पार्क, नागपूर येथे आयोजित केला आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष नाथ परंपरा आचार्य स्वामी श्री जितेंद्रनाथजी महाराज आणि प्रमुख अतिथि मा. श्री हरेराम त्रिपाठी असणार आहेत.

सदर पुरस्कार वजा सत्कार सोहळ्यास व कार्यक्रमासाठी आपला सहभाग व उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा व प्रतिष्ठा वाढेल. तसेच ह्या नावीन्यपूर्ण उपक्रमासंबंधि आपल्या वृतपत्राद्वारे / समाजमध्यमाद्वारे माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.

विनीत
हिंदू रिसर्च फाऊंडेशन
9820001954

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments