Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeविदर्भनागपूरनिकालानंतर शिवसेनेची काँग्रेस महाआघाडीत एन्ट्री होणार; अनिल देशमुखांचा दावा

निकालानंतर शिवसेनेची काँग्रेस महाआघाडीत एन्ट्री होणार; अनिल देशमुखांचा दावा

After the result, the Shiv Sena will enter the Congress Alliance Says Anil Deshmukh
नागपूर : काँग्रेस महाआघाडीबरोबर शिवसेना सत्तेत सहभागी होईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. निकाल महाआघाडीच्या बाजूने लागणार आहे. भाजपला सत्तेमध्ये शिवसेनाही नको त्यामुळे निकालानंतर शिवसेना आमच्यासोबत येईल. असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.

अनिल देशमुख हे काटोल नरखेड मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. तर भाजपकडून चरणसिंह ठाकूर रिंगणात उतरले आहेत. २०१४ साली काटोलमधून आशिष देशमुख निवडून आले होते, पण २०१८ मध्ये त्यांनी आमदारकीचा आणि भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या निवडणुकीत आशिष देशमुख यांनी अनिल देशमुख यांचा पराभव केला होता.

अनिल देशमुख यांचा दावा कितपत सत्य ठरणार हे निकालानंतर स्पष्ट होइल. मात्र देशमुखांच्या दाव्यामुळे युतीमध्येही चर्चेला उधाण आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments