मुंबई: सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. आपल्या कुटुंबासह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असता, शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या.
श्रीदेवी यांचे पार्थिव आज रात्री ११ वाजेपर्यंत अंबानी यांच्या चार्टर विमानाने मुंबईत दाखल होणार आहे. सकाळपासूनच श्रीदेवी यांच्या घराबाहेर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. सोमवारी श्रीदेवीच्या पार्थीवावर अंतिम संस्कार करण्यात येईल. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक सिने तारकांनी श्रीदेवींना ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.