Saturday, May 25, 2024
Homeमहाराष्ट्रनाराजीनाट्य : मी आमदारकीचा राजीनामा देणारच; राष्ट्रवादीतच राहणार!

नाराजीनाट्य : मी आमदारकीचा राजीनामा देणारच; राष्ट्रवादीतच राहणार!

Prakash Solanke

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा सोमवारी विस्तार झाला. काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमधील अनुभवी नेत्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. मात्र, माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे ते आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच राहणार असल्याचे आमदार सोळंके यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना स्पष्ट केले.

आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, मी कुणाबद्दल नाराज नाही, मी आमदरकीचा राजीनामा देणार. मला राजकारणाची किळस आली. मी पक्षाशी गद्दारी करणार नाही. मी भविष्यात पक्षासोबतच राहणार असं सोळंके यांनी सांगितलं. माझ्या बद्दल पक्षाने जो निर्णय घेतला त्या बाबत पक्षालाच विचारणे योग्य होईलं. असं सोळंके यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.

त्यांच्या बंधूंशी मी बोललो. नाराजी वगैरे राहत असते – अजित पवार

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. काही लोकांची नाराजी असते. माझं प्रकाश सोळंके यांच्याशी बोलणं झालं नाही. त्यांच्या बंधुंशी मी बोललो. त्यांची नाराजी दूर करू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह आता ४३ मंत्र्यांचा जॅम्बो मंत्रिमंडळ तयार झाले आहेत. मात्र, या मंत्रिमंडळाला नाराजांचे विघ्न लागले असून तिन्ही पक्षांमधून नाराजांचा सूर निघत आहे. उध्दव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाचे विस्तार सोमवारी मोठ्या थाटात झाले. या मंत्रिमंडळ सोहळ्यात नाराज आमदारांना दांडी मारली. आता नाराज आमदारांमधून आणि त्यांच्या समर्थकांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे नाराजांची मनधरणी कशी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments