Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपा व शिवसेनेच्या हिंदुत्वाताबद्दल आदित्य ठाकरेंनी भूमिका केली स्पष्ट, म्हणाले...

भाजपा व शिवसेनेच्या हिंदुत्वाताबद्दल आदित्य ठाकरेंनी भूमिका केली स्पष्ट, म्हणाले…

मुंबई : विरोधकांकडून शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन हल्लाबोल सुरु  आहे. दरम्यान, शिवसेनेचं हिंदुत्व भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं असल्याची भूमिका शिवसेनेचे युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली.प्रत्येकाचा आदर करा, सन्मान करा. कर्म हीच आस्था आहे. हेच माझं हिंदुत्व आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त एका मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं.“आमचं भाजपाचं हिंदुत्व राजकीय हिंदुत्व आहे. ते माय वे या हाय वे याचा अवलंब करतात. जर ते आपल्या हिंदुत्वाला योग्य मानतात तर पीडीपी सोबत कसे गेले? आम्ही त्यांच्या सोबत होतो.

परंतु त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. हेच का त्यांचं हिंदुत्व? त्यांचं एका राज्यात वेगळं हिंदुत्व दुसऱ्या राज्यात वेगळं हिंदुत्व असतं. आमच्यासाठी हिंदुत्व राजकीय वस्तू नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

गेल्या एक वर्षात तुम्ही विरोधकांच्या निशाण्यावर होतात, अनेक आरोप झाले असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. “त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं जास्त योग्य असल्याचा मी विचार केला.

कामावर संपूर्ण लक्ष असल्याने तिकडे लक्ष गेलं नाही. महाविकास आघाडी चांगलं काम करत असून कोणीही त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाहीत ही आमच्यासाठी  दिलासा देणारी बाब आहे. यामुळे चुकीचे आरोप आणि वैयक्तिक हल्ले झाले. पण पाच वर्ष आम्ही काम करु, राजकारण नाही,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments