Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्र‘आप’ची दुसरी यादी जाहीर ; या सात उमेदवारांना उमेदवारी

‘आप’ची दुसरी यादी जाहीर ; या सात उमेदवारांना उमेदवारी


महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. जालना, मीरा रोड, शिवाजी नगर, मुंब्रा कळव्यासह सात मतदारसंघातील आपले उमेदवार ‘आप’ने जाहीर केले आहेत. पत्रकार, रिक्षाचालक, वकील, कोचिंग क्लासचालक अशा विविध व्यवसायातील उमेदवारांचा संधी देण्यात आली आहे. आप महाराष्ट्रात जवळपास 50 जागा लढवणार आहे.

मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपने याआधीही आठ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. दुसऱ्या उमेदवार यादीत सात जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील तीन, कोकणातील दोन, तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील प्रत्येकी एका मतदारसंघाचा समावेश आहे.

  • उमेदवारांचे नाव आणि मतदारसंघ

1. कैलास फुलारी, जालना (जालना) – मराठवाडा
2. नरेंद्र भांबवानी – मीरा रोड (ठाणे) – कोकण
3. मुकुंद किर्दत – शिवाजी नगर (पुणे) – पश्चिम महाराष्ट्र
4. गणेश धमाले – बडगावंशरी (पुणे) – पश्चिम महाराष्ट्र
5. अॅड. खतीब वकील – मध्य सोलापूर (सोलापूर) – पश्चिम महाराष्ट्र
6. डॉ. सुनील गावित – नवापूर (नंदुरबार) – उत्तर महाराष्ट्र
7. डॉ. अल्तामाश फैजी – मुंब्रा कळवा (ठाणे) – कोकण

  • उमेदवारांचे नाव आणि त्यांचे व्यवसाय
कैलाश फुलारी – कैलाश फुलारी हे पत्रकार आहेत. त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवलेला आहे.

मुकुंद किर्दत – मुकुंद किर्दत हे पुणे आपचे अध्यक्ष आहेत. स्त्री-पुरुष समानतेसाठी कार्यरत ‘पुरुष उवाच’ या संघटनेच्या माध्यमातून काम करतात.

गणेश धमाले – गणेश धमाले हे व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. पुण्यातील आम आदमी रिक्षाचालक संघटनेचे ते उपाध्यक्ष आहेत.

अॅड. खतीब वकील – अॅड. खतीब वकील हे व्यवसायाने वकील आहेत. मुंबई उच्च न्यायालय आणि सोलापूर जिल्हा कोर्टात ते प्रॅक्टिस करतात. अ. भा. नागरिक ग्राहक मंचाचे ते संस्थापक आहेत.

नरेंद्र भांबवानी – नरेंद्र भांबवानी हे मीरा भाईंदरमध्ये कोचिंग क्लास चालवतात. महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनचे ते उपाध्यक्ष आहेत.

डॉ. अल्तामाश फैजी – डॉ. अल्तामाश फैजी हे संयुक्त राष्ट्रसंघाशी निगडीत आहेत. काश्मीरमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानासाठी त्यांनी काम केलं आहे.

      • या उमेदवारांना पहिल्या यादीत उमेदवारी झाली जाहीर
      • पारोमिता गोस्वामी – ब्रह्मपुरी विधानसभा
      • विठ्ठल गोविंदा – जोगेश्वरी पूर्व
      • आनंद गुरव – करवीर विधानसभा (कोल्हापूर)
      • विशाल वडघुले – नांदगाव (नाशिक)
      • डॉ. अभिजीत मोरे – कोथरूड विधानसभा (पुणे)
      • सिराज खान – चांदोली विधानसभा (मुंबई)
      • दिलीप तावडे – दिंडोशी विधानसभा (मुंबई उपनगर)
      • संदीप सोनवणे – पर्वती विधानसभा (पुणे)
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments