Tuesday, December 3, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रअहमदनगरव्यापारी गौतम हिरण हत्या प्रकरण; मारेक-यांच्या अटकेसाठी बुधवारी राज्यव्यापी आंदोलन

व्यापारी गौतम हिरण हत्या प्रकरण; मारेक-यांच्या अटकेसाठी बुधवारी राज्यव्यापी आंदोलन

‘अखिल भारतीय जैन  अल्पसंख्यंक  महासंघा’ तर्फे बुधवारी राज्यभर आंदोलन

Gautam Hiran-murder case- jain community- Statewide-protest
Gautam Hiran-murder case- jain community- Statewide-protest

बेलापुर (जि. अहमदनगर): व्यापारी गौतम हिरण यांचे 1 मार्च रोजी अपहरण होऊन निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांचा मृतदेह 6 दिवसांनी सापडला. पोलीसांच्या निष्क्रियतेमुळे  हा बळी गेल्याची महाराष्ट्रातील व्यापारी वर्ग व समाजाची भावना आहे. हत्येतील सुत्रधार व आरोपींना अटक करावी या मागणीसाठी ‘अखिल भारतीय जैन  अल्पसंख्यंक  महासंघा’ तर्फे बुधवारी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहीती राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी व राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी यांनी दिली आहे.

व्यापारी गौतम हिरण यांचे 1 मार्च रोजी अपहरण झाल्यापासुन अखिल भारतीय जैन  अल्पसंख्यंक  महासंघाने राज्य सरकारकडे त्यांचा तपास करण्याची आग्रही मागणी केली होती. राज्याचे गृहमंत्री, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. दुर्देवाने तपास न होता थेट गौतम हिरण यांचा मृतदेहच मिळाला. गौतम हिरण यांच्या अपहरण व निर्घृण हत्येमुळे हिरण कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला असुन हे कुटुंब अद्यापही या धक्यातुन सावरलेले नाही.

बेलापुरपासुन अवघ्या 10 किलोमीटर वर मृतदेह मिळाला तर पोलीसांना तपासात कसा आढळला नाही. याबाबत व्यापारी वर्गात, समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या अपहरकर्त्या खुन्यांना ताबडतोब शोधुन त्यांना कठोर शासन व्हावे यासाठी जैन समाजाची राष्ट्रीय शिखर संस्था ‘अखिल भारतीय जैन  अल्पसंख्यंक  महासंघ’ तर्फे बुधवार 10 मार्च रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येत असल्याचे ललित गांधी यांनी जाहीर केले. यावेळी संपुर्ण राज्यात व्यापारी वर्ग व जैन समाजातर्फे निदर्शने करण्यात येणार असुन स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच सर्व व्यापारी दिवसभर काळ्या फीती लावुनच कामकाज करतील.

तसेच एक आठवड्याच्या आत खुन्यांवर कार्रवाई नाही झाली तर संपुर्ण देशभर या विरोधात आंदोन उभारण्यात येईल असा ईशाराही  ललित गांधी व संदिप भंडारी यांनी दिला. सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा यांनी या हत्येचा तीव्र निषेध व्यक्त केला असुन यातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी राज्यशासनाकडे मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments