Thursday, June 20, 2024
Homeमहाराष्ट्रबातमितील ‘सत्यता’ तपासून बातमी देणे आवश्यक- आमदार आशिष शेलार

बातमितील ‘सत्यता’ तपासून बातमी देणे आवश्यक- आमदार आशिष शेलार

पत्रकारांनी बातमितील सत्यता तपासूनच बातमी देणे आवश्यक आहे. ‘बायलाईनसाठी’ बातमी दयाची म्हणून बातमी देणं हे चुकीच आहे. बातमितील सत्यता, बातमी दिल्यानंतर त्याचा परिणाम किती होईल;काय होईल हे तपासून बातमी देणं आवश्यक आहे. असा सल्ला मुंबई भाजपाचे अध्यक्ष,मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिला. दैनिक आफ्टरनून व्हॉईसच्या ‘गेस्ट एडिटर’ म्हणून शुक्रवारी सुत्रे स्विकारली होती. यावेळी कार्यालयात दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मुंबई माणूस डिजिटल वेबच्या पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी न्यूजमेकर्सच्या संचालक, आफ्टरनून व्हाईसच्या संपादक वैदेही ताम्हण या उपस्थित होत्या.

प्रश्न: अटलबिहारी वाजपेयी यांची भाजपा आणि नरेंद्र मोदी यांची भाजपा वेगळी आहे का? मोदी सरकार जाहीरतबाजीवर जास्त खर्च करतांना दिसत आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात चांगली कामं झाली. त्यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळही चांगला होता. त्यावेळी तेवढी माध्यमही नव्हती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचही चांगल काम आहे. सोशल मीडिया,जाहिरातीने काम सर्वांपर्यंत पोहचतात त्याचा वापर सरकार करत आहेत.

प्रश्न: भाजपा नेत्यांकडून ताज महाल बद्दल चुकीचे विधाने का करण्यात येत आहेत.

ज्या नेत्यांनी ताजमहाल बद्दल विधान केली. त्या नेत्यांची ती वैयक्तिक मत होती. त्या विधानांशी पक्षाशी काहीह देणघणं नाही. अशा प्रश्नांकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्हाला विकास करायच आहे यावरच आमच सध्या लक्ष आहे.

प्रश्न: शिवसेना भाजपा सोबत सत्तेत राहून विरोध का करत आहेत.

भाजपाची ताकद वाढत चालली आहे. त्यामुळे शिवसेना चिंतेत आहेत. कोणत्याही गोष्टीला विरोध करणे हे चुकीचचं आहे. स्वत:चा अजेंडा लादण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत आहेत. शिवसेनेला कळायल हवं.

प्रश्न: लाखो फेरीवाल्यांना चुकीच्या धोरणाचा फटका बसत आहेत.

जे अधिकृत फेरीवाले आहेत त्यांना जागा मिळालीच पाहिजे. त्यांच्यावर कोणतेही अत्याचार व्हायला नको. परंतु जे अनिधकृत फेरीवाले आहेत त्यांची मी बाजू घेणार नाही. फेरीवाला धोरणाची अंमलबजाणवी झालीच पाहिजे. फेरीवाल धोरण योग्य पध्दतीने राबवले तर फेरीवाल्यांवर अन्याय होणार नाही.

प्रश्न: आशिष शेलारांना मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नामदार म्हणून बघू शकतो का?

हे मुख्यमंत्र्यांना विचारा. मी मुंबई अध्यक्ष म्हणून समाधानी आहे. पक्षात अजूनही ज्येष्ठ नेते आहेत. मी पक्षाकडे मंत्रीपद मागणार नाही. पक्षाने जी जबाबदारी दिली ती स्वीकारायला मी तयार आहे. सध्या माझ्या कामात मी समाधानी आहे.

प्रश्न: राज ठाकरे म्हणाले भाजपाला विरोधकांची गरज नाही ते स्वत:खड्यात जातील.

मनसेच इंजिन कधी इकड कधी तिकडं जात. त्यांची दिशा चुकती त्यावेळी ते अस विधान करतात. राज ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या पक्षाची काय परिस्थिती आहेत त्यांनी ती बघावी. मोठ्या व्यक्तीबद्दल,पक्षाबद्दल विधान करुन आपल्याकडे लक्ष केंद्रीत करण्याचा हा प्रकार आहे.

प्रश्न: लोकलमध्ये महिला प्रवाशांवरील अत्याचार वाढले आहेत.

लोकलमध्ये सिसीटीव्ही लावण्याचे काम आमच्याच सरकारने केले आहेत. सर्व रेल्वेस्थानकांवर सिसीटीव्ही बसवून त्याची कनेक्टीव्ही पोलिस ठाण्यांमध्ये करण्याचाही निर्णय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी घेतला आहे. रेल्वेमध्ये पोलिसांना मोफत प्रवास देण्याचा विचार सुरु आहे. पोलिसांना वर्दीमध्ये प्रवास करावा लागेल यासाठी बोलणं सुरु आहे.यामुळे चुकीचे कृत्य करणाऱ्यांमध्य भितीनिर्माण होईल.

प्रश्न: डहाणू,पालघर भागात मेट्रोसाठी ज्यांच्या जमिनी जात आहेत त्या आंदोलन कर्त्यांवर गुन्हे दाखल होत आहे ते कितपत योग्य आहे.

गुन्हे दाखल होत आहे हे चुकीचचं आहे. जर विकास करायच असेल तर जमिनी जाणारच. परंतु शिवसेनेला विकास होऊ दयाचा नाही.भावनिक मुद्दे उपस्थित करुन ते विकास कामात बाधा आणत आहेत. जर मेट्रो,लोकल,बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प राबवले नाही तर भविष्यात वाहतूकीची समस्या निर्माण होईल. मुंबईतील ५२ पुल आमच्याच सरकारने केली आहेत. विकास कामाला विरोध केला तर विकास होणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments