गौतम कोरडे,मुंबई: सांताक्रूझमधील हॉटेल मालमत्ता अवैधपणे बळकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयात दमानिया आणि त्यांच्या साथीदारांविरोधात कोर्टाने पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. तक्रारीच्या आधारे दमानियासह त्यांच्या साथीरांविरोधात वाकोला पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
महानगर दंडाधिकारी जयदेव वाय घुले यांनी या महिन्याच्या सुरूवातीस हा आदेश मंजूर केला होता. सोमवारी याची सविस्तर प्रत उपलब्ध करुन देण्यात आली.
अझालीया हॉलिडे इन प्रायव्हेट लिमिटेडने कोर्टासमोर केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दमानिया आणि त्यांच्या साथीदारांनी सांताक्रूझमधील हॉटेल मालमत्तांमध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश केला होता आणि आवारातून भाजीपाला दुकान आणि दुकाने चालवत होते. तसेच दमानिया या फर्मच्या कर्मचार्यांना धमकी देत असून त्यांच्याशी अपशब्द वापरत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला होता.
वाचा: साई भक्तांना दर्शनासाठी पुन्हा एकदा नियम बदलले
तक्रारीनंतर कोर्टाने म्हटले आहे की, मुख्य आरोपी, संशयित गुन्हा आरोपीने केला आहे. तेथे कागदोपत्री पुरावे गोळा केले जावेत. कसून चौकशी करणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने सांगितले आणि गुन्हेगारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम 156 (3) अन्वये आवश्यक ते कार्यवाही व तपास करण्याचे निर्देश स्थानिक पोलिस स्टेशनला दिले.
नंतर वाकोला पोलिसांनी आयपीसीच्या कलम 341, 427, 506 and 34 of IPC आणि 34 अन्वये एफआयआर नोंदविला, अशी माहिती अधिका-यांनी दिली.
यापूर्वी इतर प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या विरुद्ध बनावट कागदपत्रं तयार करून कट रचणे, दस्तावेज चोरी करणे आणि फसवणुकीबाबत रचल्या प्रकरणी अंजली दमानियासह ६ जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
महिन्याभरापूर्वी याबाबत मुक्ताईनगर पोलिसांसह जिल्हा पोलिस अधिक्षकांना तक्रार देऊनही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने खडसेंनी या प्रकरणी कोर्टात धाव घेतली होती. मंगळवारी मुक्ताईनगर प्रथम वर्ग न्यायालयात या बाबत तीन तास युक्तिवाद झाला. यावर न्यायालयाने सदर प्रकरणात २४ तासाच्या आत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यावर आज दुपारी साडेअकरा वाजता मुक्ताईनागर पोलिसात स्वतः खडसे यांनी न्यायालयाचे आदेश सादर करून दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा क्रमांक 116 भादवी कलम 379,380,420,465,466,467,468,469,471,474,120ब आणि श कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
वाचा: सुन ले दिल्ली! ४० लाख ट्रॅक्टरसह शेतकरी संसदेला घेराव घालणार; टिकैत यांचा इशारा
अंजली दमानिया, रोशनी राऊत, गजानन मलपुरे, सुभाष परशुराम कुऱ्हाटे,सदाशिव व्यंकट सुब्रमन्याम, चारमेन फनर्स या ६ जणांचा आरोपी म्हणून समावेश आहे.
यापूर्वी अंजली दमानिया विरुद्ध 19 एप्रिल रोजी कल्पना इनामदार यांनी अंजली दमानिया यांनी खडसे यांच्याविरुद्ध कट रचल्याच्या वक्तव्य आधारे गुन्हा दाखल केला होता.
अंजली दमानिया ह्या आंदोलनजीवी
अंजली दमानिया ह्या 2017 पर्यंत सामाजिक कार्यकर्त्या होत्या. फडणवीसांसारख राजकारण करत आहेत. दमानिया यांच्याविरुध्द हॉटेलबाबत जो प्रकार आहे तो चुकीचाच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाप्रमाणे दमानिया आंदोलनजीवी आहेत.
एड.माधव सुर्यवंशी