कुर्ला पोलीस आणि ट्रान्सग्लोबल आंत्रप्रेन्योर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज फॉर अॅग्रिकल्चर यांच्या वतीने स्व.मातोश्री बायक्काबाई दगडू होवळे यांच्या स्मरणार्थ कुर्ला पश्चिम कच्छिविसा सभागृहात पोलीस कुटुंब आणि बेरोजगार गरजू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रोजगार परिषद व रोजगार मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांच्या हस्ते झाले.
यावेळी कुर्ला पोलिसांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दगडू होवळे, उद्योगपती मनोज नाथानी, डॉ.दीपनारायण शुक्ला, वीरचंद विसारिया, चेतन कोरगावकर, अश्विन कांबळे, देवेंद्र कार्ले, रियाज मुल्ला आदी उपस्थित होते. यावेळी नामांकित कंपन्या, बँका, उद्योगपतींनी उमेदवारांना जागेवरच नियुक्तीचे पत्र दिले.
Web Title: Kurlyat Bhavya Rojgar Melavyache Ayojan