नवी मुंबई : APMC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार Bhushan Pawar यांनी पोलीस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. 42 वर्षाचे भूषण पवार यांना तातडीने MGM रुग्णालयात हलवण्यात आलं. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत APMC पोलीस ठाण्यात भूषण पवार यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. दुपारी 12च्या सुमारास हा प्रकार घडला. पोलीस ठाण्यात आपल्या दालनातच त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. मात्र, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट झालं नाही. एक वर्षापासून APMC पोलीस ठाण्यात ते सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. आत्महत्येच्या या घटनेमुळे पोलीस दलाला मोठा धक्का बसलाय. पुढील तपास पोलीस करत आहेत.