Placeholder canvas
Tuesday, April 30, 2024
Homeमराठवाडालातूरबचत गटाला शून्य दराने अर्थ पुरवठ्यासह प्रत्येक घराला जोंडधंदा देणार- पालकमंञी...

बचत गटाला शून्य दराने अर्थ पुरवठ्यासह प्रत्येक घराला जोंडधंदा देणार- पालकमंञी संभाजीराव पाटील निंलगेकर

राज्य महिला आयोगामार्फत औसा व निलंगा मतदारसंघात आज प्रज्वला योजनेंतर्गत महिला बचत गटातील महिलांकरिता कायदेविषयक, सामाजिक, आर्थिक प्रशिक्षणाचे उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा.श्रीमती.विजयाताई रहाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केले.

केंद्र व राज्य शासन सर्वसामान्य लोकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवून त्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहे. तसेच हे शासन महिलांची सुरक्षितता व त्यांच्या मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन या उद्घाटन प्रसंगी केले.ना.संभाजीराव पाटील निंलगेकर म्हणाले की यावेळी औसा व निलंगा येथील खुली शासकीय इमारत महिला बचत गटांकडे देण्याची घोषणा देखील केली.

उद्घाटनास प्रज्वला योजनेच्या अध्यक्षा श्रीमती.दीपालीताई मोकाशी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.मिलींदजी लातूरे, उपाध्यक्ष श्री.रामचंद्रजी तिरुके, जिल्हा परिषद कृषी सभापती श्री.बजरंगजी जाधव, समाज कल्याण सभापती श्री.संजयजी दोरवे, बांधकाम सभापती श्री.प्रकाशजी देशमुख,औसा पं.स. सभापती श्री.दत्तोपंतजी सुर्यवंशी, निलंगा पं.स.सभापती श्री.अजितजी माने, निलंगा नगरपरिषद नगराध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंगाडे, गोदावरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष श्री.नागनाथजी निडवदे, युवा नेते श्री.अरविंदजी पाटील-निलंगेकर यांच्यासह दोन्ही मतदार संघातील महिला बचत गटाच्या प्रमुख, सदस्य प्रचंड संख्येने उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments