Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडानिलंग्यातून पुन्हा निलंगेकर, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी पवार औसा मतदारसंघातून!

निलंग्यातून पुन्हा निलंगेकर, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी पवार औसा मतदारसंघातून!

आज-उद्या म्हणता-म्हणता भाजपने अखेर आपली पहिली यादी जाहीर केली .यामध्ये लातूर जिल्ह्यातील निलंगा मधून संभाजी पाटील निलंगेकर यांना उमेदवारी मिळाली तर औसा येथून अभिमन्यू पवार यांना उमेदवारी मिळाली आहे .भाजपातून बंडकरुन आयोध्या ताई वंचित बहुजन आघाडी मध्ये गेल्या मात्र त्याठिकाणी भाजपाचे तिकीट विनायकराव पाटलांना मिळाले कदाचित ताईंना भाजपा तिकीट देणार नाही याची पूर्ण कल्पना होती . गणेश दादा हाके यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र पुन्हा एकदा गणेश दादा पाटील यांना उमेदवारी पासून वंचित राहावे लागले .औसा विधानसभा ही पारंपरिक पद्धतीने शिवसेनेचा मतदारसंघ मात्र याठिकाणी अभिमन्यू पवार यांनी गेली दोन ते तीन महिन्यापासून जनसंपर्क ला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांना तिथून निश्चित उमेदवारी मिळेल हे निश्चित झालं होतं. आणि त्यानुसार अभिमन्यू पवार यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे .निलंगा मंत्री संभाजी पाटील निलंगेकर  यांच्या व्यतिरिक्त भाजपाकडे कुणी मागणी केली नव्हती त्यामुळे संभाजी पाटील निलंगेकर यांना उमेदवारी मिळेल हे निश्चित होतं लातूर जिल्ह्याची पहिली यादी जाहीर झाली .आणि पहिल्या यादीमध्ये अहमदपूर औसा आणि निलंगा या तिन्ही मतदारसंघातील भाजप व आपले उमेदवार जाहीर केले काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली यामध्ये लातूर शहरातून आमदार अमित देशमुख यांना उमेदवारी दिली. तर औसा मधून बसवराज पाटील यांना उमेदवारी मिळाली त्यामुळे औसा मध्ये बसवराज पाटील विरुद्ध अभिमन्यू पवार असा सामना रंगणार असल्याचं  पाहायला मिळणार आहे तर निलंगा इथे काका पुतण्यात पुन्हा लढत होईल हे आता स्पष्ट झालंय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments