Monday, May 6, 2024
Homeमराठवाडालातूरपिकावरील लष्करी आळीचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी कृषि विभागाच्या सुचना

पिकावरील लष्करी आळीचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी कृषि विभागाच्या सुचना

लातूर : जिल्हयात बहुतांश ठिकाणी मका व ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळुन आले आहे. त्यासाठी खालील प्रमाणे उपाय योजना करण्याचे आवाहन जिल्हयातील शेतक-यांना उपविभागिय कृषि अधिकारी लातुर यांचे तर्फे करण्यात येत आहे.

1. भौतिक पध्द्त – पिक 30 दिवसाचे असेपर्यंत बारीक वाळु कींवा बारीक वाळु व चुन्याचे 9:1 प्रमाण करुन पोंग्यात टाकावे.

2. यांत्रिक पध्द्त – अंडीपुंज, लहान अळया व मोठया अळया हाताने वेचुन रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकुन नष्ट् कराव्यात.

3. जैविक पध्द्तीमध्ये i) ट्रायकोग्रामा प्रीटीओसम कींवा टीलीनोमस रेमस या परोपजीवी मित्रकिटकांची 50,000 अंडी प्रति एकर एक आठवडयाच्या अंतराने 3 वेळा शेतात सोडावे. कींवा ii) मेटा-हायजीयम अनिसोप्ली 50 ग्राम कींवा नोमुरीला रिलाई 50 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.

4. उपरोक्त् प्रमाणे उपाययोजना शक्य् नाही झाल्यास कींवा नियंत्रण मिळत नसल्यास रोपावस्था ते पोंगा अवस्था मध्ये निंबोळी अर्क 5 टक्के कींवा अझाडीरॅक्टीन 1500 पीपीएम 50 मिली 10 लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी. पिकाची मध्यम ते शेवटची पोंग्याची अवस्था असताना थायामिथॉक्झाम 12.6 टक्के + लॅमडा साहॅलोथ्रिन 9.5 टक्के झेडसी 5 मिली कींवा क्लोरॉन ट्रानिलीप्रोल 18.5 एससी 4 मिली कींवा स्पायनोटोरम 11.7 एससी 9 मिली 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.

हंगाम संपल्यावर पिकांच्या अवशेषाची विल्हेवाट लावावी. जमिनीची खोल नांगरट करुन मक्यामधे तुर मुग उडीद यांचे आंतर पिक घ्यावे. पिकाभोवती नेपिअर गवताच्या तीन ते चार ओळी लावाव्यात. मक्यावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन वरील पध्दतीने करण्याचे आवाहन लातूरचे उपविभागीय कृषि अधिकारी, राजेंद्र कदम यांनी केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments