Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडामराठवाड्यातील राजकारणाची व्याख्या बदलणारा नेता : ना.संभाजीभैय्या पाटील निंलगेकर

मराठवाड्यातील राजकारणाची व्याख्या बदलणारा नेता : ना.संभाजीभैय्या पाटील निंलगेकर

राजकारण म्हणजे केवळ स्वार्थ, असेच काहीसे मत समाजातील बहुतेकांचे बनले आहे. मात्र राजकारणातूनही समाज उन्नती साधता येते. लोककल्याण व लोकहिताची कामे करता येतात. एकता, बंधुता आणि मानवता या सबंध मानव जातीच्या कल्याणाच्या मूल्यांची जोपासना करता येते, हे संभाजीभैय्या यांनी गेल्या काही वर्षांत सिद्ध केले आहे. त्यामुळे जिल्ह्यासह मराठवाड्यात संभाजीभैय्याच्या रूपाने राजकारणाची व्याख्या बदलत आहे. स्वार्थ, स्वहित, जात, धर्म, पंथ, प्रांत या मानव हिताच्या आड येणाऱ्या संकुचित गोष्टींना बगल देत, जनहित आणि विकासकारण या दोनच गोष्टी केंद्रस्थानी मानून, त्याच्या पूर्ततेसाठी रात्रंदिन झटणारा राजकारणातील दुर्मिळ समाजकारणी अशी
संभाजीभैय्या यांची नवी ओळख उदयाला आली आहे.

कोणताही राजकीय वारसा, तसेच घराणेशाही पाठीशी नसताना केवळ प्रचंड इच्छाशक्ती आणि स्वकर्तृत्वाच्या बळावर एक आदर्श नागरिक, कार्यकर्ता,पक्षाचे संघटन मंत्री,आमदार,पंचायत राजचे अध्यक्ष व महाराष्टाचे मंत्री ही संभाजीभैय्या वाटचाल नव्या पिढीसाठी आदर्शवत आहे. वरवर ही वाटचाल अगदी सोपी आणि सहज वाटत असली, तरी या प्रवासात त्यांना अनंत अडचणी, अडथळे आले. मात्र संकटांना न घाबरता न डगमगता त्यांनी मार्गक्रमण सुरूच ठेवले. सुखासाठी दु:ख झेललेच पाहिजे, त्याशिवाय यशाला आणि सुखाला गवसणी घालता येणार नाही. राजकारणात तर क्षणाक्षणाला अग्निदिव्य असते. तेथे अस्तित्व टिकवायचे असेल, स्वत:ला सिद्ध करायचे असेल, तर ते तुम्हाला पार करावेच लागते. आणि वेळोवेळी संभाजीभैय्या हे अग्निदिव्य यशस्वीरीत्या पार केले आहे. त्यामागचे कारण एकच त्यांच्याकडे असलेले संघटनकौशल्य आणि त्यास मिळालेली लोकसहमती.

हाती घेतलेल्या कामावर प्रचंड निष्ठा, निःस्वार्थता, मनमिळाऊ स्वभाव, प्रचंड दैवी इच्छाशक्ती, दिलदार मित्र, कमालीचे संघटन कौशल्य, वक्तशीरपणा, नियोजनबद्धता, दूरदृष्टी, गाढा अभ्यास, लोक प्रश्नांची जाण, सक्षम कुटुंब प्रमुख, अफाट जनसंपर्क, उत्तम वक्तृत्व आणि सर्वसामान्यांचा नेता ही संभाजीभैय्या वैशिष्ट्ये. संभाजीभैय्या समाज हितासाठी घेतलेल्या राजकीय भूमिकेला ज्येष्ठांचे आशीर्वाद, तरुणांची साथ आणि सर्वसामान्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लोकांच्या सुखात स्वत:चे सुख शोधणाऱ्या या लोकनेत्याचे सर्वसामान्य जनता हीच शक्ती व ऊर्जास्थान आहे. त्यामुळे सर्वसामान्यांत वावरणारा, जमिनीवरचा नेता म्हणून लोक संभाजीभैय्या कडे पाहत आहेत.

गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात असूनही द्वेष, मत्सर, अहंकार, गर्व या गोष्टींना भैय्यांकडे स्थान नाही. गरीब-श्रीमंत, धर्म, जात-पंथ यांपैकी कोणत्याही गोष्टीची त्यांना ऍलर्जी नसून, ते मानवतेचा पुरस्कार करून सार्वभौमत्वाला प्राधान्य देतात. या निःस्वार्थ भूमिकेमुळे ते लहानांपासून ते थोरांपर्यंतच्या मनांवर अधिराज्य गाजवितात. म्हणूनच की काय महाराष्ट्रातील राजकारणातील ते अजातशत्रू आहेत. कार्यरत असलेल्या पक्षात तर संभाजीभैय्यांच्या कामाचा गौरव होतोच; पण विरोधकही त्यांनी केलेल्या कामांचा आदराने उल्लेख करतात. हीच खरी संभाजीभैय्यांची कमाई आहे. चक्क विरोधकांनी कामाचा गौरव करावा, असे उदाहरण लातूर वगळता राज्यात कोठे पाहण्यास मिळणार नाही.

संभाजीभैय्या एखाद्या गावात गेले आणि तेथे शेकडो लोक काही मिनिटांत जमले नाहीत, असे कधीच झाले नाही. लातूर जिल्ह्यात असे एकही गाव नसेल, त्या गावातील किमान 50 ते 70 लोकांना भैय्या त्यांच्या नावानिशी ओळखत नसावेत. प्रत्येक गावातील बहुतांश लोकांकडे भैय्यांचा मोबाईल नंबर आहे. दिवस असो किंवा रात्र, आलेला प्रत्येक फोन भैय्या स्वत: उचलतात. समोरच्याचे म्हणणे ऐकून घेतात. संबंधित व्यक्तींचे समाधान करूनच फोन ठेवतात. त्यामुळेच रात्री दोन वाजता आणि पहाटे चार वाजताही भैय्यांच्या घरी लोक समस्या घेऊन येतात. येताना दु:खी असले, तरी परत जाताना मात्र त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान असते. त्यामुळेच संभाजीभैय्या लोकांना आपले वाटतात आणि संभाजीभैय्या लोकांना आपलेच मानतात. या एक विचाराच्या आणि एकतेच्या जोरावर संभाजीभैय्या राजकारणाच्या माध्यमातून या भागात मानवतेचा आणि आपुलकीचा झरा पाझरत ठेवला आहे.

त्यांनी आजपर्यंत केलेल्या आणि करीत असलेल्या विकासकामांची तसेच लोकहिताची यादी मोठी आहे. त्यांच्या विचारांत आणि व्यक्तिमत्त्वात स्वार्थापेक्षा जनहित अधिक असल्याने, त्यांचे भविष्य आणखी उज्ज्वल असणार, यात तिळमात्र शंका नाही. राजकारणासाठी राजकारण नव्हे, तर समाजकारणासाठी राजकारण या भैय्यांच्या नव्या संकल्पनेमुळे त्यांच्या रूपाने येथील राजकारणाची व्याख्या बदलत आहे. हेच नव्या पिढीसाठी आणि नव्या समाजासाठी आश्वासक चित्र आहे.
आज ना. संभाजीभैय्या पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त व पुढील कार्यास माझ्या मनपुर्वक शुभेच्छा !!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments